अनाथ, दिव्यांग व वृद्ध व्यक्तींना लसीकरणासाठी सहकार्य

स्माईल फाउंडेशनच्या सहकार्यातून सुमारे 350 व्यक्तींचे लसीकरण

0

जब्बार चीनी, वणी: स्माईल फाउंडेशने परिसरातील सुमारे 350 अनाथ, दिव्यांग व वृद्ध व्यक्तींना लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहित केले तसेच त्यांना लसीकरण करण्यासाठी विविध मदत पुरवली. सध्या तरी कोरोनावर लस हाच एकमेव उपाय आहे. मात्र लसीकरणासाठी अनेकांची गैरसोय होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन स्माईल फाउंडेशनने दिव्यांग, वृद्ध, अनाथ व्यक्तींना लसीकरण केंद्रात वाहनाने पोहोचवण्यापासून ते केंद्रावर आराम करण्याची, पाणी इ सेवा देण्यात आली.  बाजीराव वृद्धाश्रमातील वृद्धांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

कोरोनाच्या काळात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरणाकडे पाहिले जाते . शासन, प्रशासन तसेच विविध सामाजिक संस्था लोकांमध्ये जागृती करीत आहे. मात्र अद्यापही लशीबाबत गैरसमज आहे. त्यामुळे अनेक लोक लस घेण्यास अनुत्साही आहे. यावर स्माईल फाउंडेशनने पुढाकार घेत परिसरातील अनाथ, दिव्यांग व वृद्धांमध्ये जागृती करून त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचवण्यास मदत केली.

स्माईल फाउंडेशनचे सागर जाधव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यासाठी त्यांना बाजीराव वृद्धाश्रम अध्यक्ष सुहास नांदेकर, मारुती चोपणे, नामदेव शिलवडे यांच्यासह डॉक्टर सुलभेवार, अधिपरीचारिका कुडमेथे यांनी सहकार्य केले.

हे देखील वाचा:

वणी रोटरी क्लबची कार्यकारिणी जाहीर

दारु तस्करांची अनोखी शक्कल, गाडीच्या बोनेटमध्ये लपवून तस्करी

मारेगाव (कोरंबी) येथे सुमारे 2 लाखांची घरफोडी

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.