वणीतील सर्वात कमी दरात खरेदी करा सोलर झटका मशिन
वैष्णवी सोलर सिस्टम व ईलेक्ट्रॉनिक्समध्ये मान्सून ऑफर सुरु.....
बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील गेल्या 12 वर्षांपासून शेतक-यांचा विश्वास संपादन करणारे वैष्णवी सोलर सिस्टम व इलेक्ट्रॉनिक्स येथे मान्सून (श्रावण) ऑफर सुरु झाली आहे. विराणी टॉकीज रोड, डॉ. काळे याच्या दवाखान्याजवळ वणी येथे वैष्णवी सोलर सिस्टमचे शोरुम व गोडावून असून ग्राहकांना येथे विविध प्रकारची सोलर झटका मशिन बॅटरीचा डेमो घेता येणार आहे व मशिन खरेदी देखील करता येणार आहे. विशेष म्हणजे मान्सून ऑफरमध्ये ग्राहकांना 50 एकरची मशिन अवघ्या 5990 रुपयामध्ये उपलब्ध होणार आहे. ही आतापर्यंतची सर्वात कमी किंमत आहे. यासह ग्राहकांना एलईडी व डीटीएच देखील खरेदी करता येणार आहे. एकदा ग्राहकांनी शॉपला भेट द्यावी, असे आवाहन संचालक राजू किन्हेकर यांनी केले आहे. ग्राहकांना अधिक माहितीसाठी 8999124806 व 9923394280 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
आता वर्कशॉप आणि शॉप एकाच ठिकाणी
वैष्णवी सोलर सिस्टम व ईलेक्ट्रॉनिक्स हे शॉप आता वरोरा रोड येथून स्थानांतर झाले असून आधी असलेल्या गोडावूनच्या (वर्कशॉप) ठिकाणीच आता शॉप सुरु झाले आहे. विशेष म्हणजे वैष्णवी सोलर सिस्टम येथील झटका मशिनमध्ये सुप्रसिद्ध असलेल्या सुरक्षक या प्रसिद्ध ब्रँडची बॅटरी आहे. 15 एकरच्या मशिनमध्ये 12 वोल्ट व 12 एम्पीअरची बॅटरी आहे. विशेष म्हणजे ही मशिन डायरेक्ट मॅन्युफॅक्चर करून ग्राहकांना दिली जाते. त्यामुळे ग्राहकांना इतर ठिकणी मिळणा-या रेटपेक्षा कमी दरात मशिन खरेदी करता येते.
सदर मशिन ही रात्री बंद होते तर सकाळी सुरू होते. एक आठवडा जरी सूर्यप्रकाश नसला तरी मशिन काम करीत राहते व पिकांचे संरक्षण होते. तार तुटल्यास किंवा पिकांच्या फांदीचा स्पर्श झाल्यास अलार्म सुरू होतो. बॅटरी डिसचार्ज होत नाही. कोरड्या जमिनीवरही ही सिस्टिम काम करते. याशिवाय अर्थिंगसाठी तार शेतात फिरविण्याची गरज नाही. विशेष म्हणजे पावसाळ्यात ताराला हिरवळ लागल्यास बॅटरी डिसचार्ज होण्याची समस्या असते मात्र या मशिनमध्ये ही समस्या येत नाही.
पत्ता – वैष्णवी सोलर सिस्टम व ईलेक्ट्रॉनिक्स
डॉ. काळे यांच्या हॉस्पिटल जवळ, विराणी टॉकीज रोड जवळ गुरुनगर, वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: राजू किन्हेकर – 8999124806 व 9923394280



Comments are closed.