जन सुरक्षा विधेयक आणि प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

विधेयकाचे दहन करत पुरोगामी संघटना व पक्षांचे शिवतीर्थावर निदर्शन आंदोलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्यासमोर लोकशाहीवादी संघटना व पक्षांनी आंदोलन केले. त्यात जन सुरक्षा विधेयकाचा विरोध तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या विरोधात निदर्शने केलीत. यावेळी आंदोनकांनी जन सुरक्षा विधेयकाची होळी केली.

जन सुरक्षा विधेयक हे संघटना बांधण्याचा व आंदोलन करण्याचा अधिकारावर गंडांतर आणत असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. त्यासाठी त्यांनी उपविभागीय अधिकारी व पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले. यावेळेस संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अजय धोबे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अनिल हेपट, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अंबादास वागदरकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, बाळासाहेब खैरे यांनी आपली मत मांडलीत. या निषेध आंदोलनाचे संचालन दत्ता डोहे यांनी केले.

यावेळी किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ. ॲड. दिलीप परचाके, वणी वकील संघाचे सचिव ॲड. अमोल टोंगे, प्रवीण खानझोडे, गुरुदेव संघटनेचे दिलीप भोयर, भाकपचे जिल्हा सचिव कॉ. अनिल घाटे, वसंत थेटे, सुरेंद्र घागे, विनोद बोबडे, विलास शेरकी, भाऊसाहेब आसुटकार, शंकर पुनवटकर, संजय तेलंग, दिलीप वागदरकर, नितीन मोवाडे, कृष्णदेव विधाते, पंढरी मोहितकर, पांडुरंग किन्हेकर, जानू अजानी, अजय कवरासे, राहुल खारकर, मारुती मोडक , मंगेश खामनकर, विनोद बोबडे, विलास शेरकी, संजय गोडे, आशीष रिंगोले आदी उपस्थित होते.

Comments are closed.