वंचितचा मारेगाव, झरी तालुक्यात झंझावाती संवाद दौरा

शेकडो कार्यकर्त्यांचा डॉ. नीरज वाघमारे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

बहुगुणी डेस्क , वणी: वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांची सध्या यवतमाळ जिल्ह्यात संवाद यात्रा सुरु आहे. त्यांनी मारेगाव आणि झरी या तालुक्यांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्ता यांच्याशी संवाद साधला. मारेगाव तालुक्यातील दौरा 12 ऑगस्ट 2025 रोजी आणि झरी तालुक्यातील दौरा 14 ऑगस्ट 2025 रोजी संपन्न झाला. या दौऱ्यांनी गावोगावी प्रचंड उत्साह निर्माण केला असून, बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला.

मारेगाव तालुक्यातील दौरा 
मारेगाव तालुक्यातील मारेगाव, आकापूर, लाखापूर, चिंचमंडळ, मार्डी, देवाळा, सिंदी, बोटोणी, नवरगाव, सगणापूर, सराटी, सालेभट्टी, कोलगाव इत्यादी गावात संवाद यात्रा गेली. या दौऱ्यात गावोगावी मोठ्या प्रमाणात सभा झाल्या. डॉ. नीरज वाघमारे यांनी संबोधनात सांगितले की, प्रस्थापित आणि मनुवादी पक्षांनी बहुजन चळवळीचे तुकडे करून फुले-शाहू-आंबेडकरी शक्तीचे खच्चीकरण केले आहे. अशा परिस्थितीत फक्त बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी हाच पक्ष वंचितांना सत्तेकडे नेणारा मार्ग दाखवू शकतो. असे त्यांनी नमूद केले. प्रत्येक गावात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. 

दुर्गम भागात साधला संवाद 
झरी तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागात झालेल्या या दौऱ्याला गावक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी संवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले. जामणी, सतपल्ली, पाटण, जुनोनी, अडेगाव, राजुर, मांगली आदी गावांना भेटी देत डॉ. वाघमारे यांनी स्थानिकांशी संवाद साधला. त्यांनी दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय शोषणाविरुद्ध लढा उभारण्याचे आवाहन केले. वंचित बहुजन आघाडी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसह सत्तेत मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. झरी तालुक्यातील दौ-यातही मोठ्या संख्येने पक्षप्रवेश झालेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या संवाद यात्रेत मिलिंद पाटील (जिल्हा महासचिव), राजेंद्र निमसटकर, राजीव कांबळे, प्रियल पथाडे, गौतम हस्ते, राजबा धोटे, महादेव धोटे, गगन ड्यागर्लावार, अशोक बट्टावार, अनुप भांदककर, शरद पळवेकर, सुखदेव वाघमारे, नवनाथ देवतळे, भूषण काटकर, गंगाधर बनकर, राजीव करमणकर, निकेश कांबळे, राजू धोटे, गौतम मून, उत्तम मून, गौतम बाराहाते, सुधाकर नरांजे, हेमराज नगराळे, अमर रामटेके, ओमप्रकाश तेलंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.