वंचितचे दिलीप भोयर यांनी हाती घेतली तुतारी

मुंबईत शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित सहका-यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी शुक्रवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची मुंबई येथील वसंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेवून आपल्या सहकाऱ्यासह त्यांनी पक्ष प्रवेश केला. दिलीप भोयर हे गेल्या 4 वर्षांपासून वंचित बहुजन आघाडीत काम करीत होते. आधी त्यांना वंचितचे तालुका अध्यक्षपद व नंतर विधानसभा अध्यक्ष असे पद पण मिळाले. मात्र विधानसभा निवडणुकीपासून ते राजकीयदृष्ट्या अस्वस्थ होते. त्यामुळे ते पक्ष सोडणार असे जवळपास निश्चित मानले जात होते.

ऐन विधानसभेच्या तोंडावर त्यांनी वंचित बहुजन आघाडीला जय भीम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस डॉ. ऍड. अंजली साळवे (विटणकर) यांच्या नेतृत्वात तर माजी आमदार संदीप बाजोरिया व जिल्हाध्यक्षा वर्षा निकम यांच्या मार्गदर्शनात, वणी विधानसभा अध्यक्ष सूर्यकांत खाडे व मारेगाव तालुकाध्यक्ष भारत मत्ते यांचे उपस्थितीत दिलीप भोयर आणि सहका-यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतले.

त्यांच्या सोबत बळीराजा पार्टीचे विधानसभा अध्यक्ष रामदास पखाले, वंचितचे तालुका उपाध्यक्ष मंगेश गोरे, वंचीत युवा शाखेचे शहर उपाध्यक्ष मनोज दुर्गे, वंचितचे तालुकासह सचिव प्यारेलाल मेश्राम, निंबाळा येथील माजी सरपंच चंपत पाचाभाई, सामाजिक कार्यकर्ते अतुल पिदूरकर, शरद खुसपूरे, गणराज टेकाम, घाटंजी येथील विलास साबापूरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments are closed.