दारूचा गुत्ता नष्ट करणा-या महिलांचा राज ठाकरेंनी केला सन्मान

वनोजा व गोंडबुरांडा येथील महिलांनी पकडली होती अवैध दारू

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गोंडबुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी अवैध दारू पकडून ती जाळून नष्ट केली. या धाडसाबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान करत कौतुक केले. यापूर्वीदेखील मनसेचे राजू उंबरकर यांनीदेखील या महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहित केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या महिलांनी आपल्या साहसाने आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून समाजातील अवैध धंद्यांविरुद्ध लढा दिला आहे. या कार्यामुळे त्यांनी आपल्या परिसरात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. राज ठाकरे यांनी या महिलांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. समाजातील प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील अवैध धंद्यांवर लक्ष ठेवून त्यावर योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, महिला शक्तीने केलेले हे कार्य समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे.

Comments are closed.