वसंत जिनिंग निवडणूक: जय सहकार पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उदघाटन

यावेळीही एकतर्फी विजयी मिळवू, ऍड. देविदास काळे यांचा विश्वास

जितेंद्र कोठारी, वणी: वणी उपविभागात सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठित दि वसंत कॉपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी या संस्थेच्या संचालक मंडळासाठी येत्या 6 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. वसंत जिनिंगचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांच्या नेतृत्वात जय सहकार पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. शुक्रवारी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी टागोर चौक येथे जय सहकार पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. उदघाटन प्रसंगी ऍड. देविदास काळे यांनी वसंत जिनिंग निवडणुकीत जय सहकार पॅनलचा एकतर्फी विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला.

दि वसंत कॉपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी संस्थेच्या वणी, शिंदोला, मार्डी, मारेगाव व मुकुटबन येथे जिनिंग प्रेसिंग युनिट आहे. मागील 10 वर्षांपासून ऍड. देविदास काळे वसंत जिनिंग संस्थेच्या अध्यक्ष पदी आहे. वणी, मारेगाव आणि झरीजामनी तालुक्यातील 10 हजार 934 शेतकरी वसंत जिनिंग संस्थेचे सभासद आहे. यात 7 हजार पेक्षा जास्त सभासद ऍड. काळे यांचे कार्यकाळात जुळले आहे.

सहकार पॅनलकडून वर्तमान अध्यक्ष ऍड. देविदास काळे, विजय चोरडिया, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रशांत गोहोकार, प्रेमकुमार खुराणा, विलास मांडवकर, पवन एकरे, पुंडलिक भोंगळे, संजय पारखी, लुकेश्वर बोबडे, मोहन जोगी, अमोल ठाकरे, सुरेश बरडे, सुनील वरारकर, वंदना भोंगळे, मंदा पाचभाई व नामदेव सुरपाम संचालक पदासाठी निवडणूक लढत आहे.

सहकार पॅनल प्रचार कार्यालय उदघाटन प्रसंगी ऍड. देविदास काळे, प्रदीप बोनगीरवार, विजय चोरडिया, शमीम अहमद, प्रशांत पाचभाई, रमेश भोंगळे, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रेमकुमार खुराणा, विवेक मांडवकर, भास्कर गोरे, सुरेश बनसोड, प्रमिला चौधरी, काजल शेख व इतर उमेदवार उपस्थित होते.

या निवडणुकीत 17 जागांसाठी 63 उमेदवार रिंगणात उतरले आहे. ऍड देविदास काळे यांच्या जय सहकार पॅनलसह माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात परिवर्तन पॅनल, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्त्वात शेतकरी एकता परिवर्तन पॅनल व शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, भाकप यांनी एकत्र येत वसंत जिनिंग पॅनल या नावाने पॅनल उतरवले आहे.

Comments are closed.