मानोरा येथे संत. श्री. डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलचे लोकार्पण

0
96

मानोरा: मानोरा तसेच परिसरातील सर्व जनतेला आरोग्य सेवा पुरवण्याच्या उद्देशाने मानोरा येथे गुरुवारी दिनांक २७/१०/२०२२ रोजी संत. श्री. डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हेल्थ केअर अँड डायग्नोस्टिक्स सेंटर, सोनोग्राफी सेंटरचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. पोहरादेवीचे महंत, धर्मगुरू श्री. बाबुसिंगजी महाराज यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मानोरा नगरपंचायतचे नगराध्यक्ष हेमेन्द्र ठाकरे तसेच प्रमुख अतिथि म्हणून मानोरा पंचायत समितीच्या नवनियुक्त सभापती सुजाता अरुण जाधव उपस्थित होत्या.

कार्यक्रमाला महंत संजय महाराज, मानोरा तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. महेशचंद्र चापे, डॉ. एन. पी. नांदे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मानोरा, डॉ. सुहास देशमुख अध्यक्ष डॉक्टर असोसिएशन मानोरा, समाज प्रबोधनकार पंकजपाल महाराज, पं.स.सदस्य अभिषेक चव्हाण, शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते विठ्ठलराव घाडगे, शेतकरी नेते मनोहर राठोड, तांडा सुधार समितीचे अध्यक्ष ना. मा. बंजारा, राजू गुल्हाने, रवी पवार, प्रेमसिंग राठोड, आरोग्य विभागाचे मानके यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदर लोकार्पण सोहळ्या निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 773 रुग्णांनी तपासणी केली. संत. श्री. डॉ.रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल अँड क्रिटीकल केअर सेंटर दिग्रसचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संदीप दुधे उपस्थित होते तसेच डॉ.प्रशांत रोकडे (एम.एस.)जनरल सर्जन, डॉ.आशिष शेजपाल (एम.डी.) मेडिसिन, डॉ. श्याम जाधव (नाईक)(एम.बी.बी.एस.डी.जी.ओ.) स्त्री रोग तज्ञ, डॉ.कल्पना जाधव (नाईक), (एम.बी.बी.एस.डी.जी.ओ.एफ.आय.सी.एम.सी.एच.) स्त्री रोग तज्ञ, डॉ.श्रीकृष्ण पाटील (एम.एस.शल्य) आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ, डॉ.निलेश जाधव (एम.डी) बालरोग तज्ञ, डॉ.सिद्धांत जाधव (बि.डी.एस.) दंतरोग तज्ञ, या तज्ञ डॉक्टर मार्फत रुग्णांची तपासणी करण्यात आली.

Previous articleऐन दिवाळीत भूमिहिन, निराधार राजूचे घर आगीत जळून खाक
Next articleवसंत जिनिंग निवडणूक: जय सहकार पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उदघाटन
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी 2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Loading...