वणीकर खवय्यांना मिळणार आता लाईव्ह किचनचा आनंद… वेदा रेस्टॉरन्टचे आज उद्घाटन

पाँडेचेरी, बेंगलोर, दिल्ली येथील शेफची टीम खास वणीकरांच्या सेवेत..... शेवाळकर परिसर येथे सुरू होत आहे वेदा रेस्टॉरन्टची नवीन ब्रँच (प्युर वेज)....

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील सुप्रसिद्ध वेदा या रेस्टॉरन्ट चेनची नवीन ब्रँच वेदा (प्युर वेज) रेस्टॉरन्ट शहरातील शेवाळकर परिसर येथे आजपासून सुरू होत आहे. बुधवारी दिनांक दिनांक 16 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता या रेस्टॉरन्टचे ग्रॅन्ड उद्घाटन होणार आहे. तीन माळ्यांच्या या सुसज्ज रेस्टॉरन्टमध्ये 160 ग्राहकांची बैठक व्यवस्था आहे. विशेष म्हणजे भारतातील विविध डिशसह देशविदेशातील विविध डिशचा आस्वाद वणीकरांना पहिल्यांदाच लाईव्ह किचनद्वारा घेता येणार आहे. यासाठी खास पाँडेचेरी, बेंगलोर, दिल्ली येथील शेफची टीम बोलवण्यात आली आहे. 

वणी शहरात चांगलेच मुरलेले खवय्ये आहे. शिवाय पारंपरिक डिश सोडल्या तर त्यापेक्षा अधिक आणि नवीन डिश शहरात उपलब्ध नाही. स्पेशल शेफ उपलब्ध नसणे किंवा अप्रशिक्षित शेफ यामुळे नवीन डिश व टेस्ट खवय्याना मिळत नाही. फक्त चांगल्या टेस्टसाठी आणि नवीन डिशसाठी खवय्ये वणीतून चंद्रपूर, नागपूर, अदिलाबाद येथे जातात. खवय्यांची ही गरज लक्षात घेऊन वेदा रेस्टॉरन्टमध्ये विविध नव नवीन डिशचा आनंद ग्राहकांना घेता येणार आहे. अशा विविध डिश बनवण्यासाठी दिल्ली, बंगलोर व पाँडीचेरी येथील स्पेशल शेफ बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आता वणीकरांना चांगली टेस्ट आणि नवीन डिशसाठी इतर ठिकाणी जावे लागणार नाही.

काय मिळणार खवय्यांना ?
वेदा रेस्टॉरन्टमध्ये पंजाबी, महाराष्ट्रीयन डिश, कॉन्टीनेन्टल, चायनीय, साउथ इंडियन डिश उपलब्ध आहेत. याशिवाय देश विदेशातील अधिकाधिक डिश उपलब्ध करण्यात आल्या आहेत. साउथ इंडियन डिश या पाँडिचेरी येथील शेफच्या टीमद्वारा बनवल्या जाणार आहे. तर पंजाबी डिश या दिल्लीतील शेफच्या टीमद्वारा बनवल्या जाणार आहेत. तंदुरच्या विविध डिश आणि चाटचे विविध प्रकारही येथे चाखायला मिळणार आहे. जेवणानंतर आईसक्रिम, ज्युस, शेक, मॉकटेलचा आनंदही ग्राहकांना या ठिकाणी घेता येणार आहे. सोबतच टेकअवे व पार्सल सुविधाद्वारेही ग्राहकांना वेदा येथील डिशचा आस्वाद घेता येणार आहे. 

फॅमिली पार्टी, ग्रुप पार्टीसाठी विशेष व्यवस्था
वेदा रेस्टॉरन्ट हे तीन माळ्याचे सुसज्ज असे रेस्टॉरन्ट आहे. यात 160 जणांची एकाचवेळी बैठक केली जाऊ शकते. तळमजल्यावर लाईव्ह किचन आहे. तर पहिला व दुसरा माळ्यावर बैठक व्यवस्था केली आहे. रेस्टॉरन्टच्या खुल्या जागेतही खवय्यांना गार्डन बैठकीचा आनंद घेत जेवण करता येणार आहे. यासह बर्थ डे, ऍनिवर्सरी इत्यादी स्पेशल ओकेशन, फॅमिली पार्टी, ग्रुप पार्टी, मिटिंगसाठी वेगळी व्यवस्था ग्राहकांना मिळणार आहे.

बुधवारी दिनांक 16 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता रेस्टॉरन्टचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून खा. बाळू धानोरकर व आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांची उपस्थिती राहणार आहे. यासह माजी आ. वामनराव कासावार, किरण देरकर, देविदास काळे, महेंद्र लोढा, भरत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उद्घाटनानंतर लगेच रेस्टॉरन्ट सुरु होणार आहे.

शहरातील तसेच परिसरातील खवय्ये तसेच फॅमिलीने एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन संचालक अभिजित (अखिल) सातोकर, अतिश सातोकर यांच्याकडून करण्यात आले आहे.

पत्ता:  वेदा प्युर वेज रेस्टॉरन्ट                         राम शेवाळकर परिसर, यवतमाळ रोड वणी अधिक माहितीसाठी संपर्क: 9730894567

Comments are closed.