सुशील ओझा, झरी; तालुक्यातील वेडद येथे ५ तर जामनी येथे ७ रुग्ण आढळल्याने तालुक्यात रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ झाली. दोन दिवसांत तालुक्यात १६ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. वेडद येथे ५ रुग्ण लिंगटी ३ व येदलापूर येथे १ अशी वाढ झाली. तालुक्यात दोन दिवसांपूर्वीच रुग्ण मिळाले असतानाच दुसऱ्या दिवसाला वेडद व जामनी येथे अजून रुग्ण मिळाले आहे.
शासनाने तालुका व ग्राम दक्षता समिती तयार केली असून ग्रामदक्षता समिती फक्त नावापूर्तीच राहिली काय असे दिसत आहे. कोरोनाबाबत जनजागृती, मास्क बांधणे, सॅनिटायझर वापर करणे किंवा शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करीत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कोरोनामुळे वेडद येथील एकाच मृत्यूसुद्धा झाला आहे. १२ सप्टेंबरच्या रात्री उशिरा जामनी येथील तपासणीचे रिपोर्ट प्राप्त झालेत. त्यात ७ पॉजिटिव्ह रुग्ण आढळलेत. १३ सप्टेंबरला तहसीलदार रामचंद्र खिरेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम, गटविकास अधिकारी सुधाकर जाधव, पाटणचे ठाणेदार हे आपल्या कर्मचारी घेऊन पोहचलेत.
पोजिटिव्ह रुग्णांना झरी येथील राजीव विद्यालयात हलविण्यात आले. तर १०० मीटरचा परिसर सील करण्यात आला. तालुक्यात कोरोना रुग्णांनी अर्धशतक पार केले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य, महसूल व पोलीस प्रशासन त्रस्त होत आहे. रुग्ण आयसोलेशन वॉर्डपर्यंत नेणे, कंटेन्मेंट झोन करणे व इतर कामाकरिता मॅनपॉवरपासून तर इतर सुविधा पुरविणे कठीण होत आहे.
छोटा तालुका असल्याने कोरोना रुग्णांना संख्या वाढल्यास सुविधा देण्यास मोठी कसरत करावी लागणार आहे. तरी जनतेनी स्वतःला कोरोनापासून बचाव करण्याकरिता मास्कचा वापर अनिवार्य आहे. सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टनसिंग ठेवणे तसेच आवश्यक काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. परंतु याचे पालन खूप कमी प्रमाणात होत असल्याने रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतआहे.