मुकूटबनमध्ये भाजी महागली, किराना मालाची चढ्या दराने विक्री

40 रुपये किलोची भाजी झाली 60 ते 70 रुपये

0

 सुशील ओझा, झरी: सध्या संचारबंदी लागताच त्याचा आर्थीक फायदा करून घेणा-यांचीही संख्या वाढली आहे. भाजीपाली विक्रेता, औषधी विक्रेता व किराणा दुकानदार हे चढ्या दराने विक्री करीत आहेत. अशा तोंडी तक्रारी ग्रामपंचायतीकडे करण्यात आल्या आहेत.

भाजीजीपाला विक्रेते वणी वरून ठोक दरात भाजीपाला आणून चिल्लर मध्ये दुप्पट दरात विक्री करीत आहे. भाजीपाला विक्रेते भेंडी वांगे ढेमसे ६० रुपये तर कांदे ५० रुपये किलोने विक्री करून दुप्पट भावाने विक्री करून जनतेला लुटण्याचे काम करीत आहे. तर बाहेर गावातील शेतकरी भाजपला कमी दरात विक्री करण्यासाठी आला असता त्याला हाकलून देत असल्याची माहिती मिळत आहे.

तर औषधी दुकानात एकच औषधीच्या दरात तफावत असल्याची ओरड ऐकाला मिळत आहे. तर काही किराणा दुकानात सुद्धा सामानाच्या दरात तफावत असल्याच्या अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत.

ग्रामपंचायततर्फे लावण्यात आले फ्लेक्स
यावरून ग्रामपंचायतने पुढाकार घेतला आहे. गोरगरीब जनतेला लुटणाऱ्यावर अंकुश लावण्याकरिता सरपंच शंकर लाकडे उपसरपंच अरुण आगुलवार, सचिव कैलास जाधव व इतर सदस्य यांनी बसस्टॉपवर जाहीर सूचनेचा मोठे  फ्लेक्स लावले आले. गावात व चौकातही  जाहीर सूचनेची नोटीस लावण्यात आली आहे. जाहीर सुचनेमध्ये औषधी दुकानदार भाजीपाला विक्रेते व किराणा दुकानदार यांनी अवैध साठा करून जास्त दराने कोणतेही वस्तू विक्री करू नये.
समाजसेवा समजून रास्त भावात विक्री करावी. आधीच गोरगरीब जनतेचा रोजगार नसल्याने गंभीर परिस्थिती ओढवली आहे. तरी जास्त दराने वरील दुकानातून जादा दराने वस्तू विक्री केल्यास अत्यावश्यक सेवा कायदा अंतर्गत ग्रामपंचायत कडून कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सुचनेचे फलक लावण्यात आले आहे. तसेच कुणी जास्त दराने वरील दुकानातील वस्तू विकत असेल तर त्यांची तक्रार ग्राहकांनी ग्रामपंचायतमध्ये करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.