शनिवारी पोलीस स्टेशन वणी येथील 34 वाहनांचा लिलाव
वाहनावर मालकी हक्क सांगण्याची अखेरची संधी, लिलावा आधी संपर्क साधण्याचे आवाहन
विवेक तोटेवार, वणी: दारू पिऊन गाडी चालविणे, चोरी किंवा अन्य गुन्ह्यांत वाहने जप्त होतात. ही वाहने मग पोलीस ठाण्यात जमा करतात. त्यानंतर एका ठराविक काळापर्यंत वाहनाचे मालक दावा करण्याची वाट पाहतात. नंतर कोणी दावा करणारे आले नाही तर त्याचा लिलाव होतो. असाच वणी पोलीस ठाण्यात जप्तीच्या वाहनांचा लिलाव शनिवारी दिनांक 12 मार्चला स. 11 वाजता होत आहे. कुणाला या वाहनावर मालकी हक्क सांगावयाचा असल्यास त्यांना ही शेवटची संधी आहे. लिलाव होण्याच्या आधी वाहन मालकांनी तात्काळ पोलीस स्टेशन, वणी येथे वाहनाचे मुळ कागदोपत्र/दस्तावजासह हजर राहावे, असे आवाहन ठाणेदार गोपाळ उंबरकर यांनी केले आहे.
Comments are closed.