ऍड. सुरज महारतळे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

0

वणी (विलास ताजने): नागपूर येथे नुकतेच विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी पार पडलेल्या कार्यक्रमात वणी येथील ऍड. सुरज महारतळे यांची विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. आमदार निवास सभागृहात आयोजित संमेलनात विविध मागण्या आणि ठराव मंजूर करण्यात आले. ठरावात विदर्भातील खासगी आणि सरकारी नोकरी मध्ये केवळ विदर्भातील तरुणानांच नोकऱ्या ध्याव्यात, बेरोजगार युवकांना सरकारने रुपये सहा हजार प्रति महा बेरोजगार भत्ता दयावा आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव दयावा आदी मागण्यांचा समावेश आहे.

Podar School 2025

१ मे महाराष्ट्र दिनी नागपूर येथील विधानभवणावर मोर्चा काढून तेथे विदर्भाचा झेंडा लावला जाणार आहे. तसेच ७ व ८ एप्रिलला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचे ठरविले. याप्रसंगी नवनियुक्त जिल्हाध्यक्षानी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ऍड.वामनराव चटप, राम नेवले यांसह युवकांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.