झरपट येथे तुकडोजी महाराज, गाडगेबाबा पुण्यस्मरण सोहळा

0

वणी (रवि ढुमणे): वणी शहरापासून अगदी जवळच असलेल्या झरपट(पाखडगाव) येथील गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमुर्ती संत गाडगे महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा आयोजित केला आहे. सोबतच विविध कार्यक्रमासह भजन संमेलन कार्यक्रम शनिवार व रविवारी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा जनतेनी लाभ घेण्याचे आवाहन झरपट ग्रामस्थांनी केले आहे.

वणी शहरापासून जवळच असलेल्या झरपट येथील गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामस्थांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा शनिवार व रविवारला आयोजित केला आहे.  पहाटे पासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यात ग्रामसफाई, दिंडी, रांगोळी स्पर्धा,ध्यान चिंतन, रविवारी भजन संमेलन, कीर्तन, व काला होणार आहे.

या पुण्यस्मरण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष इंदिरा सहकारी सूत गिरणी चे अध्यक्ष सुनील कातकडे, प्रमुख उपस्थिती ग्रामगीताचार्य विजया दहेकर, व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या पुण्यस्मरण सोहळ्याचा जनतेनी लाभ घेण्याचे आवाहन गुरुदेव सेवा मंडळ व झरपट येथील ग्रामस्थांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.