अमरावतीचा अब्दुल शोएब ठरला यंदाचा विदर्भ केसरी
स्पर्धेत नागपूर आणि अमरावतीच्या मल्लांचा बोलबाला
विवेक तोटेवार, वणी: 20 ते 22 एप्रिल या कालावधीत वणीतील जत्रा मैदान येथे स्वर्गीय कालिदासजी अहीर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भ केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या स्पर्धेत अब्दुल शोएब हा विदर्भ केसरी ठऱला. सदर कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, रामदासज तडस विदर्भ कुस्तीगीर चे कार्याध्यक्ष, जगप्रसिद्ध कोच महासिंग राव, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू राजीव यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे ठरले विजेते
महिला गट – 42 किलो वजन गटात प्रथम अनुष्का ठाकरे नागपूर, द्वितीय खुशी श्रीनाथ, तृतीय अमृता विजेते ठरले. तर 44 किलो वजन गटात प्रथम रेश्मा शेख चंद्रपूर, द्वितीय सविता गोमासे व तृतीय आसिंका मनोहरे विजेते ठऱले. 48 किलो वजन गटात प्रथम कल्याणी गादेकर, द्वितीय अंजली शाम, तृतीय उज्वला पाढे, 50 किलो वजन गटात प्रथम परितोषिकांचे मानकरी काजल बाबूध्ये, द्वितीय कल्यानी मोहारे, तृतीय दीपाली चाचरकर. 55 किलो वजन गटात प्रथम प्रिया खारजाळे, द्वितीय तनु जाधव, तृतीय पूजा भरड. 59 किलो वजन गटात प्रथम संगीत टेकाम, द्वितीय दीक्षा वासनिक, तृतीय मेघा कुमरे, 63 किलो वजन गटात प्रथम निकिता लांजेवार, द्वितीय खुशबू चौधरी, तृतीय अमृता जाधव, 63-75 खुल्या किलो गटात प्रथम शीतल सव्वालाखे, द्वितीय गौरी धोटे तर तृतीय विजेता ठरली गीता चौधरी यांनी 11 हजार रुपये व 9000 रुपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरुष गट
कुमार गट- 42 किलो वजन गटात प्रथम पारितोषिक मयूर चौधरी, द्वितीय पारितोषिक अर्जुन गाढेकर, तृतीय पारितोषिक गौरव खडसे यांनी पटकाविले. 46 किलो वजन गटात प्रथम शेख जुनेद, द्वितीय योगेश माधवे, तृतीय सत्यम राठोड, 50 किलो गटात प्रथम अनिकेत हजारे, द्वितीय पंकज माधवे, तृतीय वैभव गिडघासे. 54 किलो प्रथम कुणाल जाधव, द्वितीय प्रेमान्शु, तृतीय निखिल सारवाण बुलढाणा तर 61 किलो प्रथम पारितोषिक गोविंद कपाटे, द्वितीय नितीन चव्हाण, तर तृतीय पारितोषिक गोलू महते विजेते ठरले.
65 किलो वजन गटात प्रथम अजय पाखमोडे, द्वितीय लक्ष्मण इंगोले, तृतीय पारितोषिक विकास शिंदे यांनी पटकाविले. तर 70 किलो वजन गटात प्रथम पारितोषिक अक्षय लोनगाडगे, द्वितीय दिनेश तोडकर तर तृतीय क्रमांक इस्माईल शेख यांनी पटकावले. तर 70 किलो वजन गटाच्या वर प्रथम पारितोषिक अब्दुल शोएब अमरावती, द्वितीय नवनाथ भूषणार वर्धा यांनी पटकाविले. विदर्भ केसरी अब्दूलला 31 हजार रुपये व चांदीची गदा प्रदान करण्यात आली.
पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे संचालन जयंत सोनटक्के व चंद्रपूरचे मोंटु यांनी केले. तर प्रास्ताविक हंसराज अहीर यांनी केले उपस्थितांचे आभार तारेन्द्र बोर्डे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष पांडुरंग लांजेवार, दिलीप खाडे, विजय थेरे, नंदू गंगाशेट्टीवार, मोरेश्वर बोंडे, सूर्यकांत मोरे, सुरेंद्र इखारे, जितेंद्र डाबरे, गजानन कावडे, सवाई, सुरज निखाडे, दिलीप मालेकर, अक्षय बोबडे, राजू देवळे, पंकज ओचावार यांनी परिश्रम घेतले.