विवेक तोटेवार, वणी: स्वर्गीय कालिदासजी अहिर यांच्या स्मृती पित्यर्थ वणीतील जत्रा मैदानात विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आाहे. तीन दिवस चालणा-या या स्पर्धेचे शुक्रवारी 20 एप्रिलला संध्याकाळी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वर्धेचे खासदार रामदास तडस हे राहणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, विजय पिदूरकर उपस्थित राहणार आहे.
तीन दिवस रंगणा-या या कुस्तीच्या दंगलीचं प्रमुख आकर्षण हे जगप्रसिद्ध कोच आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त राजस्थानचे महासिंग राव असणार आहे. यासोबतच हिंदकेसरी आणि नाववंत कुस्तीगिरांचा देखील उपस्थिती इथे राहणार आहे. या स्पर्धेत 350 महिला आणि पुरुष सहभागी होणार आहे.
ही स्पर्धा तीन गटात होणार आहे. कुमार गट, युवक गट आणि पौढ असे गट यात असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ही दंगल पारंपरिक माती ऐवजी आंतराष्ट्रीय नियमाप्रमाणे मॅटवर होणार आहे. या स्पर्धेसाठी 40 नामवंत पंच देखील येणार आहेत.
खासदार व आमदार चषक स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजयी स्पर्धकांना स्वर्णपदक, रौप्यपदक आणि कास्यपदक तसंच रोख बक्षीस देखील दिलं जाणार आहे. ही स्पर्धा वणीकरांसाठी एक मेजवानी असून वणीत रंगणा-या या स्पर्धेचा सर्वांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे.