वणीच्या विमाशी संघाच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा

0
विलास ताजने, वणी: वणी येथील धनोजे कुणबी सभागृहात (दि.८) रविवारला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा जिल्हास्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्याचे उदघाटन माजी शिक्षक आमदार व्ही.यू.डायगव्हाणे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी वि.मा.शि. संघाचे प्रांताध्यक्ष श्रावण बरडे होते.
अतिथी म्हणून वि.मा.शि. संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, विभागीय कार्यवाह एम.डी.धनरे, प्रांतिक उपाध्यक्ष अरविंद देशमुख, मेळावा निरीक्षक दिलीप कडू, जयप्रकाश धोटे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, श्रीहरी शेंडे, मनोज पारखी, वर्धा जिल्हा कार्यवाह महेंद्र सालंकार, संदीप चौरे, जिल्हाध्यक्ष अशफाक खान उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्रीमती नुसाबाई चोपणे विध्यालयाच्या मुलींनी स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक अशोक आकुलवार यांनी केले.
मान्यवरांनी शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा करून मार्गदर्शन केले. मेळाव्यात १४ प्रकारचे ठराव विचार विनिमय करून पारित करण्यात आले. ठरावाचे जाहीर वाचन गजेंद्र काकडे यांनी केले. माजी प्रांतिक उपाध्यक्ष व्ही.बी.टोंगे यांचा शाल, श्रीफळ देऊन अमृत महोत्सवी सत्कार करण्यात आला. भुपेंद्र देरकर, जयश्री राजूरकर यांनी मानपत्राचे वाचन केले.
तसेच वणीच्या राजर्षी शाहू महाराज विध्यालयाचे शिक्षक तथा साहित्यिक गंगारेड्डी दशरथ बोडखे यांच्या ‘अंधारलेल्या वाटा’ या कथा संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. संचालन वंदना शंभरकर, सोनाली कोंडेकर यांनी केले. आभार दत्तू महकुलकर यांनी मानले. मेळाव्यात वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी विमाशीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.