विजेच्या जिवंत विद्युत ताराच्या स्पर्शाने दोन बैलाचा मृत्यू

शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांचे नुकसान, नुकसानभरपाईची मागणी

0 373

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथील शेतकऱ्याच्या शेतात विजेच्या जिवंत तारांच्या स्पर्शाने दोन बैलांचा मृत्यू झाला. येथील शेतकरी राजगडकर यांच्या शेतातून उपसरपंच प्रवीण नोमुलवार यांच्या शेतात कृषी पंपाकरिता विद्युत पुरवठा करिता लाईनचे केबल (तार) अनेक वर्षापासून टाकण्यात आले आहे. यातील दोन केबल (तार) १२ सप्टेंबरला तुटून खाली पडलेले होते. दुपारच्या वेळेस बैल चरत असताना तुटलेला विद्युत प्रवाह सुरू असलेल्या जिवंत तारांवर बैलाचे पाय पडल्याने दोन बैलाचा जागीच मृत्यू झाला.

दोन बैलांचा मृत्यू झाल्याने पाटण येथील शेतकरी राकेश एडमलवार यांचे ६० हजार व शेख क्रीम शेख सत्तार यांचा ४० हजाराचे नुकसान झाले आहे. बैलाचा विद्युत स्पर्शाने मृत्यूची माहिती मिळताच प्रवीण नोमुलवार यांनी वीज वितरणचे अभियंता मालते आणि कर्मचारी यांना बोलावून विद्युत पुरवठा बंद करण्यास सांगितले. तसेच घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चव्हाण आपल्या सहकाऱ्यांसह व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. दोन्ही शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आह

Comments
Loading...