आरोग्य शिबिरात 1200 तर सामान्य ज्ञान स्पर्धेला 1600 विद्यार्थ्यांचा सहभाग

विजय चोरडिया यांचा वाढदिवस विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून साजरा.... शिलाई मशिन, कपडे वाटप, वृक्षारोपण इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सुप्रसिद्ध व्यावसायिक, समाजसेवक विजय चोरडिया यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वणी शहरात शनिवारी भव्य मोफत आरोग्य शिबिर व मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर रविवारी दुपारी झालेल्या स्पर्धा परीक्षेला सुमारे 1600 विद्यार्थ्यी सहभागी झाले होते. याशिवाय सकाळी झालेल्या दौडला देखील वणीतील क्रीडाप्रेमींनी व खेळाडुंनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला.

विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त 2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर असे तीन दिवस विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी संध्याकाळी नागपूर येथील ऑर्केस्ट्राने या तीन दिवशीय कार्यक्रमाला सुरूवात झाली. मुकुटबन रोडवरील श्रीविनायक मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात गरजू महिलांना इनरव्हिल क्लबद्वारे शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले.

शनिवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी श्रीविनायक मंगल कार्यालय येथे भव्य आरोग्य शिबिर व नेत्ररोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिरात हृदयरोग, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, चर्मरोग, नाक-कान-घसा इत्यादी आजारांचे निदान व उपचार करण्यात आले. तसेच रुग्णांना मोफत औषधीचे वाटपही करण्यात आले. गरजू रुग्णांना श्रवण यंत्रेही वाटप करण्यात आले. नागपूर येथील लता मंगेशकर हॉस्पिटलच्या सहकार्यातून हे शिबिर घेण्यात आले.

आरोग्य शिबिरात वणी व परिसरातील रुग्ण सहभागी झाले

लवकरच मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया
सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पिटलच्या सहकार्यातून नेत्र रोग व मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सेवाग्राम तेथील तज्ज्ञ डॉक्टरांनी डोळ्यांची समस्या असलेल्या रुग्णांची तपासणी केली. शिबिरात मोतीबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांची लवकरच सेवाग्राम येथील हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या सर्व रुग्णांचा उपचार, औषधी व शस्त्रक्रियेचा खर्च विजय चोरडिया यांच्या द्वारे केला जाणार आहे. या शिबिरात सर्व रुग्णांकरीता चहापान व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सदर आरोग्य शिबिर प्रभू राम जन्मोत्सव समितीद्वारा आयोजित करण्यात आले आहे.

चाहते व मित्रपरिवारांनी दिल्या शुभेच्छा
वाढदिवसानिमित्त रविवारी सकाळी 7 वाजता शिवतीर्थ येथे विजय चोरडिया व त्यांच्या मित्र परिवारांतर्फे छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. दुपारी विजय चोरडिया यांनी जैताई मंदिरात जाऊन जैताई मातेचे दर्शन घेतले. तिथे समितीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.रेल्वे स्टेशन कॉलोनी, टिळक चौक, मोमिनपुरा इत्यादी ठिकाणी भेट देऊन चाहते व मित्रपरिवारांच्या शुभेच्छांचा स्विकार केला. तर दुपारी श्री विनायक मंगल कार्यालय येथे मा. खा. हंसराज अहिर, मा. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, श्रीकांत पोटदुखे, इत्यादी मान्यवरांच्या व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केक कापून विजय चोरडिया यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी हंसराज अहिर व मान्यवरांनी बुके देऊन विजय चोरडिया यांना शुभेच्छा दिल्या. 

सामान्य ज्ञान स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद
रविवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता शिवतीर्थ येथे मॅराथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. प्रा. दिलिप मालेकर यांच्या मार्गदर्शनात जेसीआय वणी द्वारा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या दौडमध्ये वणीतील 100 पेक्षा अधिक मुला मुलींनी सहभाग घेतला होता. सकाळी 11 वाजता विद्यार्थ्यांसाठी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सुमारे 1600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील विद्यार्थ्यांसह पांढरकवडा, वरोरा इत्यादी तालुक्यातूनही विद्यार्थी आले होते. स्पर्धेच्या निकालाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असून विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह बक्षिस दिले जाणार आहे. स्माईल फाउंडेशनच्या सहकार्यातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था देखील आयोजकांतर्फे करण्यात आली होती.

आपल्या सर्वांचे प्रेम असेच कायम असू द्या – विजय चोरडिया
आपल्या सर्वांनी वाढदिवसाला जे भरभरून प्रेम आणि शुभेच्छा दिल्यात हिच माझ्या आयुष्यातील खरी कमाई आहे. वाढदिवसानिमित्त कुणी प्रत्यक्ष भेटून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तर कुणी कॉल करून शुभेच्छा दिल्यात. याबाबत मी सर्वांचा कायम ऋणी राहील. याशिवाय वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्या सर्वांचे तसेच चाहते, कार्यकर्ते, मार्गदर्शक, मित्र परिवार इत्यादींचे कोटी कोटी कोटी आभार.
– विजय चोरडिया, समाजसेवक

दुपारी 4 वाजता जिजाऊ नगर, जागृत हनुमान मंदिराजवळ वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. यावेळी विजूभाऊ चोरडिया यांच्यासह शहरातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते मंदिराच्या आवारात 20 रोपटे (ट्रीगार्डसह) लावण्यात आले. नगरसेवा समिती द्वारा हा उपक्रम राबवला गेला. तर संध्याकाळी आनंद बालसदन येथे भेट त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा केला. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.