विजय चोरडिया…. सामान्यांसाठी झटणारा असामान्य माणूस !

परिसरात दातृत्वाचे धनी अशी ओखख असलेले विजय चोरडिया यांच्यावर विशेष लेख

कुठल्याही कामाचे फळ मिळो अथवा न मिळो. आपण आपले कार्य करत राहावे. हाच वसा घेऊन चालणारे क्वचितच लोक असते. त्यातील एक  म्हणजे वणीतील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य आणि परिसरात दातृत्वासाठी ओळखले जाणारे विजय चोरडिया.

समाजकारण, धार्मिक कार्य असो की राजकारण – प्रत्येक ठिकाणी माणूस हाच केंद्रबिंदू राहिला आहे. कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता समाजकल्याणासाठी त्यांनी अविरत काम केले आहे. गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, धार्मिक, क्रीडा, कला, पर्यावरण, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये भव्य आणि प्रभावी उपक्रम राबवले आहेत. वर्षभर सामाजिक उपक्रम सुरू ठेवणारे ते वणी विधानसभा क्षेत्रातील एकमेव नेते मानले जातात.

समाजकारणासोबतच त्यांचा प्रवास कळत-नकळत राजकारणात वळला. पक्षात एक कुशल संघटक अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. स्वच्छ, पारदर्शी आणि परिणामकारक कार्यावर त्यांचा नेहमी भर राहिला आहे. “समाजकारणाला राजकारणाची जोड मिळाल्यास अधिक व्यापक बदल घडवता येतात” या विचाराने त्यांनी गेल्या काही वर्षांपासून वणी विधानसभा क्षेत्रात संघटितपणे कार्य सुरू केले आहे.

विजय चोरडिया यांचे वडील स्व. पारसमल चोरडिया हे व्यापारी तसेच शेतकरी होते. त्यांचा सोने-चांदी विक्रीचा व्यवसाय आजही परिसरात परिचित आहे. विजय चोरडिया यांचे प्राथमिक शिक्षण अमरावती येथे झाले तर माध्यमिक व ज्युनियर कॉलेजचे शिक्षण वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात पूर्ण झाले. महाविद्यालयीन काळातच ते विद्यार्थी चळवळीत सक्रिय झाले आणि याच काळात त्यांना राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळाली. कॉलेजमध्ये असतानाच विद्यापीठ निवडणुकीत भाग घेतला आणि याच टप्प्यावर त्यांचा राजकारणात प्रवेश झाला.

25 वर्षाआधी समाजकार्याला सुरुवात
सन 2000 साली त्यांनी जेसीआय ही संघटना जॉईन केली. कार्याचा धडाका व उत्साह यामुळे 2002 साली जेसीआयचे अध्यक्षपद मिळाले. या काळात जेसीआयच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वणी शहर व तालुक्यात विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले. 2003 साली सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. या काळात तरुणांसाठी विविध कार्यक्रम व उपक्रम राबवले. त्यामुळे अल्पावधीतच तरुण नेतृत्व म्हणून परिसरात ओळख मिळाली. तेव्हापासून त्यांचे शैक्षणिक, धार्मिक, आरोग्य इत्यादी क्षेत्रात भरीव काम सुरू आहे.

पुढच्या पिढीकडे हाच वारसा
विजय चोरडिया यांचे पुत्र अॅड. कुणाल चोरडिया हे आपल्या वडिलांचा सामाजिक व राजकीय वारसा पुढे नेत आहेत. बालपणापासूनच त्यांना वडिलांच्या कार्याची जवळून ओळख झाली. तिथूनच प्रेरणा घेऊन ते आज समाजासाठी कार्य करीत आहे. ते देखील विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. विजय चोरडिया यांनी पेटवलेली ही समाजसेवेची ज्योत कुणाल चोरडिया यांच्या माध्यमातून पुढच्या पिढीकडे अधिक तेजाने झळकताना दिसते.

वणीतील सुप्रसिद्ध व्यावसायिक, सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर आणि दातृत्वाचे धनी असलेले मा. श्री. विजय चोरडिया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎉💐आपल्याला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि यश लाभो ही सदिच्छा 🙏 

शुभेच्छुक – विजय चोरडिया मित्र परिवार 

Comments are closed.