विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर इजारा अनेक समस्यांच्या विळख्यात आहे. समस्यांचे निवारण 8 दिवसात न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करीत गावातील कचरा ग्रामपंचायतीपुढे टाकणारा असल्याचे निवेदन मनसे विभागप्रमुखांनी ग्रामपंचायत सचिवास दिले आहे. सदर निवेदन हे बुधवार 14 ऑक्टोबर रोजी देण्यात आले आहे.
इजारा गावकरी यांनी राजूर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष निवेदनातून सामोर आणून दिले. गावातील पथदिवे बंद आहेत. गावात कचरा व घाण साचली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले नाही. त्यातच राजूर इजारा येथील नागरिकांना गेल्या काही दिवसापासून डेंग्यू , टायफाईड, मलेरिया यासारखे आजाराने ग्रासले आहे.
ग्रामपंचायततीची परिस्थिती इतकी बिकट आहे की, अनेक गावकऱ्यांना ग्रामपंचायतीमध्ये जाऊन समस्यांची सोडवणूक करावी लागत आहे. निवेदन द्यावे लागत आहे. येथील ग्रामपंचायत अधिकारी सुस्त झालेत. नागरिकांचा आरोग्याशी खेळ करीत आहे. असाही आरोप मनसेने निवेदनातून केला आहे.
पुढील काळात नवरात्र येत असून या समस्या वाढतच आहेत. जर या समस्या संपुष्टात आल्या नाहीत तर ,मनसे विभाग प्रमुख प्रदीप बांदूरकर व सर्व गावकरी यांनी ग्रामपंचायतीला समोरच्या भूमिकेवर आम्ही जबाबदार राहणार नाही असे स्पष्ट संकेत त्यांचा निवेदनातून दिले आहे.
जर येत्या आठ दिवसात वरील समस्या न सोडविल्यास मनसे विभाग प्रमुख प्रदीप बांदूरकर व गावकरी ग्रामपंचायत समोर सर्व कचरा आणून टाकतील! असा इशारा मनसे विभागप्रमुखांनी ग्रामपंचायतीला दिला आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)