विवेक तोटेवार, वणी: स्थानिक महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी पिडीतेने तिच्या वडलांसोबत पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तकर दाखल केली आहे.
गुरुवारी 4 ऑक्टोबर रोजी पीडिता ही नेहमीप्रमाणे महाविद्यालयात गेली. सकाळी 10 वाजताच्या सुमारास इंग्रजी चा तास ऑफ असल्याने ती कॉम्प्युटर क्लाससाठी निघाली. वाटेतच तिच्यावर डोळा ठेऊन असलेल्या मोहन महादेव ठाकरे (27) याने तिला वाटेतच रोखून अगोदर तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. परन्तु पीडितेने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही व पुढे चालत गेली. याच वेळी मोहनने पीडितेचा हाथ पकडून तिचा विनयभंग केला. या घटनेच्या अगोदरही मोहनने पीडितेसोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता. परन्तु तिने याकडे दुर्लक्ष केले व कुणाला सांगण्याचे धाडस केले नाही. यामुळे ही घटना घडली.
पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर कलम 354 नुसार गुन्हा नोंद केला आहे. घटनेचा तपास ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Prev Post