एमपीएससी परीक्षांचे कंत्राट खाजगी कंपन्यांना देऊ नका

वीर भगतसिंग विदयार्थी परिषदेची निवेदन देऊन मागणी

0

सुशील ओझा, झरी: एमपीएससी (Mpsc) सारख्या परीक्षा महा पोर्टलद्वारे घेण्यात आल्या. मात्र त्यातुन कामात टाळाटाळ, भ्रष्टाचार, नावाचा घोळ इत्यादी अऩेक गोंधळ निदर्शनास आणुन दिल्या नंतरच हे पोर्टल बंद करण्यात आले. मात्र या परीक्षांची जबाबदारी एमपीएससीवर सोपवण्या ऐवजी पुन्हा एखाद्या खासगी कंपनीला हे कंत्राट देण्याचा सरकारचा मानस आहे, असा आरोप करत या परीक्षेचे कंत्राट खासगी कंपनीला देऊ नये अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेद्वारा करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की पूर्वीच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना खासगी कंपन्यांच्या त्यांचा व्यवहारावर शंका आहे. पूर्वीची भरती ही रखडलेल्या अवस्थेत आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असतात निदान देशाचा भविष्यासाठी तरी आमच्या हिताचा विचार करून शिक्षण क्षेत्रातले खाजगीकरण थांबवावे. परीक्षा टेंडर न काढता त्याची जबाबदारी पुन्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सोपवावी अशी मागणी तहसिलदारांना निवेदन देऊऩ करण्यात आली आहे.

यावेळी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद जिल्हाध्यक्ष समीर लेनगुळे झरी तालुकाध्यक्ष, कुणाल पानेरी तालुका उपाध्यक्ष, श्रावण टिकले तालुका सोशल मीडिया प्रमुख, वैभव कुडमेथे, सचिव वैभव मोहीतकर, कार्याध्यक्ष योगेश जेऊरकर, शहराध्यक्ष प्रशांत राऊत, संतोष केराम, प्रफुल्ल उईके आदी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.