वणी येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती रॅली

0

वणी: देशातील सर्व मतदारांना मातदानाप्रति जागृत करण्याच्या दृष्टीने देशभर 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून वणी येथे निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तर 25 जानेवारीला 9 वाजता येथील शासकीय मैदानापासून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यानंतर राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम महसूल भवन मध्ये होणार आहे.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शहरातील प्रमुख रस्त्यावरून रॅली निघणार आहे. ही रॅली मतदानासंबंधी संदेश देत फिरणार आहेत. ही रॅली शासकीय मैदानावरून निघून तिथेच समारोप होणार आहे. समारोप प्रसंगी मतदानाची प्रतिज्ञा देवून उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार व तहसीलदार रवींद्र जोगी मार्गदर्शन करणार आहेत.

त्यानंतर महसूल भवन मध्ये मतदार दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी 1 जानेवारी 2000 ला जन्मलेल्या सहस्रक मतदारांना, नवागत मतदारांना मतदान कार्ड व उत्कृष्ठ काम करणाऱ्या केंद्र स्तरावरील मतदान अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सर्व जागृत मतदारांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महसूल विभागातर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.