एलटी कॉलेजमध्ये पार पडले मतदार नोंदणी शिबिर
पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्थानिक लोकमान्य टिळक महाविद्यालयामध्ये दिनांक 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान मतदार नोंदणी शिबिर पार पडले. या शिबिरात 430 युवकांनी मतदार म्हणून नोंदणी केली. राज्यशास्त्र विभाग व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार निखिल धुळधर, नायब तहसीलदार अशोक ब्राम्हणवाडे, प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांच्या मार्गदर्शनात पार पडले.
महसूल अधिकारी एस.पी. डांगळे, नगर परिषद प्रशासकीय अधिकारी व्ही.महाकुलकर, अभियंता सुबोध भगत, कर अधीक्षक तेजस हगोने, सहाय्यक शिक्षक जे.सूर्यवंशी, महसूल अधिकारी उमाकांत डवरे, महसूल अधिकारी जयंत झाडे, महसूल अधिकारी एन व्ही.बांगडे, पंचायत समिती सांख्यिकी विभागाचे अधिकारी सुरेश पाझरे, तलाठी सुनील उराडे, यांचेसह कोतवाल अंगुल पुसते, राकेश संकीलवार, उत्तम पाचभाई, विकास चिडे, नरेंद्र बोढाले, आशिष टिपले, प्राचिता ठावरी, पूजा मेश्राम, कवडू साउरकर, निलेश उईके यांनी युवकांना मतदार नोंदणी फॉर्म भरताना सहकार्य केले.
यावेळी लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ विकास जुनगरी , डॉ.गणेश माघाडे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय निवडणूक प्रणालीचे व लोकशाही विचारांचे महत्त्व पटवून दिले. यापूर्वी ०२ ऑगस्ट रोजी राज्यशास्त्र विभागाने मतदार नोंदणी व मतदानाचे महत्त्व हा कार्यक्रम आयोजित करून युवा मतदारांमध्ये जागृती निर्माण केली.त्यानंतर तीन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी निवृत्त मुख्याध्यापक दीनानाथ आत्राम, महाविद्यालयातील गुरुजन वर्ग तसेच सेवानिवृत्त कर्मचारी दिनकर उरकुडे यांचेसह कार्तिक देशपांडे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
Comments are closed.