पावणे 12 लाखांच्या वॉलकंपाउंडला 15 दिवसांतच पडल्यात भेगा

रेतीऐवजी काळ्या चुरीचा वापर करून नित्कृष्ट दर्जेचे बांधकाम!

0

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडच्या जुडाई व छपाईच्या कामात रेती ऐवजी काळ्या चुरीचा वापर करण्यात आला. काळी चुरी वापरून नित्कृष्ट दर्जेचे काम केल्याने संपूर्ण कंपाऊंडच्या भिंतीला 15 दिवसांतच मोठमोठे तडे गेले आहे. त्यामुळे सदर बांधकाम किती दर्जेदार केल्याचे दिसून पडले आहे. वॉलकंपाउंड कामाबाबतची तक्रार वरीष्ठ अधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे.

खनिज विकासनिधी अंतर्गत ग्रामपंचायती मार्फत जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडचे काम करण्यात आले. संपूर्ण बांधकामात रेतीचा वापर न करता काळ्या चुरीचा वापर केल्याचे बोलले जात आहे. 15 दिवसांपूर्वीच वॉलकंपाउंडचे संपूर्ण काम झाले. चारही दिशांनी बांधलेल्या वॉलकंपाउंडच्या भिंतीवर मोठमोठल्या भेगा पडल्यात.

बांधकाम निकृष्ट दर्जाचे तर आहेच आणि त्यावर पाणीसुद्धा मारण्यात आले नाही. त्यामुळे वॉलकंपाउंड कधी पडणार हेसुद्धा सांगता येणार नसल्याची ओरड गावकरी करीत आहेत. शासनाच्या 11 लाख 76 हजारांचा निधी वाया जात आहे.

ठेकेदार राजकारणाशी संबंधित असल्यामुळे वॉलकंपाउंड बांधकाम करताना संंबंधित अभियंत्याने पाहणी किंवा तपासणी केली की नाही, असाही संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडच्या कामात मोठा गैरप्रकार झाला असून सदर कामाची योग्य पडताळणी केल्याशिवाय कोणतीहि देयके काढण्यात येऊ नये. तसेच शासनाच्या निधीचा चुराडा करून स्वतःचे पोट भरणारे व ठेकेदाराला सहकार्य करणाऱ्या अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे दयाकर गेडाम यांनी बांधकाम विभाग पालकमंत्री जिल्हाधिकारी, सीईओ व इतर ठिकाणी केली आहे.

येदलापूर येथील कामावर याच ठेकेदाराने अवैधरीत्या विना रॉयल्टी 6 ब्रास रेतीचा साठा केल्याप्रकरणी 92 हजाराचा दंड तहसीलदार गिरीश जोशी यांनी थोटावला होता हे विशेष. तालुक्यात राजकीय ठेकेदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तरी तालुक्यातील सर्व ठेकेदारांच्या सुरू असलेले वॉलकंपाउंड व गाव अंतर्गत रोड इतर कामाची पाहणी अधिकाऱ्यांनी करून खराब काम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कार्यवाहीची सुद्धा मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा

तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरू… गुरुवारी 22 पॉजिटिव्ह

हेदेखील वाचा

लहान पांढरकवडा येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

 

 

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.