वॉलकंपाउंडचे बोगस काम लपविण्याकरिता प्लास्टिक पेंटचा वापर
येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडचे काम निकृष्ट करण्यात आले. संपूर्ण भिंतींना 15 दिवसांत भेगा पडल्यात. याची तक्रार करण्यात आली. त्याचे वृत्तही प्रकाशित झाले. दुसऱ्या दिवशी रात्री सदर ठेकेदाराच्या कामगारांनी येदलापूर जाऊन जाड असे प्लास्टिक पेंट मारून कंपाऊंडवर पडलेल्या भेगा बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
परंतु गावकऱ्यांनी तोही हाणून पाडल्याचे चित्र दिसत आहे. जनतेने सदर पेंट उखडून पहिला व ठेकेदार आपली चोरी लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी ओरड गावकऱ्यांकडून होत आहे. हे 11 लाख 76 हजार रुपयांचे बांधकाम असून संपूर्ण कामात लागणारी रेती नावालाच आहे.
फक्त काळ्या चुरीचा वापर करून हे बांधकाम करण्यात आले. बांधकाम होऊन 15 दिवस होताच संपूर्ण कंपाऊंडवर भेगा पडल्यात. या कामाबद्दल गावकऱ्यांत प्रचंड संताप उफाळला आहे. या कामाची तक्रार शिवसेनेचे दयाकर गेडाम यांनी बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी, पालकमंत्री व इतर ठिकाणी केली.
संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय कोणतेही देयके काढू नये अशी मागणी केली. वॉलकंपाउंडचे काम एवढे खराब होत असतानासुद्धा संंबंधित अभियंता हे काय करीत होते? कामाची क्वालिटी न पाहता संपूर्ण काम कसे काय होऊ दिले, असाही संतप्त प्रश्न ग्रामवासी करीत आहे. अशा ठेकेदार अभियंता यांच्या कामाची चौकशी होऊन फौजदारी गुन्हे दाखल झालेच पाहिजे अशी मागणी होत आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
[…] वॉलकंपाउंडचे बोगस काम लपविण्याकरिता … […]
[…] वॉलकंपाउंडचे बोगस काम लपविण्याकरिता … […]