अखेर कुख्यात ‘राजू’ लागला वणी पोलिसांच्या हाती

जितेन्द्र कोठारी, वणी : चोरी घरफोडी सारख्या अनेक गुन्ह्यात पोलिसांना वांटेड असलेला कुख्यात गुन्हेगार राजू पोटे अखेर रविवारी वणी पोलिसांच्या हाती लागला. पोलीस येण्याची चाहूल लागताच पळून जात असताना वणी पोलिसांच्या डीबी पथकाने पाठलाग करून आयटीआय कॉलेज जवळ शिताफीने त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपी राजू पोटे याला वणी न्यायालयात हजर केले असता त्याची यवतमाळ कारागृहात रवानगी करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार राजू पुरुषोत्तम पोटे (47) रा. नवीन लालगुडा, वणी याच्यावर वणी पोलीस स्टेशनमध्ये चोरी, घरफोडीचे अनेक गुन्हा दाखल आहे. सराईत आणि अट्टल गुन्हेगार म्हणून त्याची परिसरात ओळख आहे. राजू पोटे हा 19 मे 2023 रोजी रात्री जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने इतर 5 साथीदारसह जंगली पीर दर्गाजवळ अंधारात दबा धरून बसला होता. तत्कालीन ठाणेदार पो.नि. प्रदीप शिरस्कर यांना याबाबत मिळालेल्या माहितीवरून त्यांनी सपोनि दत्ता पेंडकर व स्टाफसह रात्री 12 वाजता जंगली पीर दर्गाजवळ छापा टाकला.

त्याठिकाणी पोलिसांना संतोष उर्फ डोमा मेश्राम, शेख शाहरुख शेख सलीम, शेख इरफान शेख सलीम व अनिल विनायक येमुलवार मिळून आले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन राजू पोटे आणि शेख सद्दाम शेख उस्मान हे दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. तेव्हा पासून राजू पोटे हा पोलिसांच्या तावडीतून बाहेर होता. वणीचे ठाणेदार पोलीस निरीक्षक अजित जाधव यांना रविवार 10 सप्टे. रोजी पोलिसांना हवा असलेला आरोपी राजू पोटे हा वागदरा जवळ नदी किनाऱ्यावर लपून बसून असल्याची माहिती मिळाली.

माहितीवरून सपोनि माधव शिंदे डीबी पथकासह वागदरा परिसरात राजू पोटे याला पकडण्यासाठी गेले. पोलीस येण्याची चाहूल लागताच राजू पोटे यांनी तिथून पळ काढली. मात्र डीबी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी पाठ्लाग करून आयटीआय कॉलेज जवळ शिताफीने राजू पोटे याला ताब्यात घेतले. सदर कार्यवाही उ.वि.पो.अ. गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजित जाधव, एपीआय माधव शिंदे, पीएसआय सुदाम आसोरे जमादार विकास धाडसे, कॉन्स्टेबल शुभम सोनुले, सागर सिडाम, सुनील नलगंटीवार, मोनेश्वर खंडरे यांनी केली.    

 

Comments are closed.