वणी झालं ‘‘हादसों का शहर’’ अपघातात तिघांचा मृत्यू

0

जितेंद्र कोठारी, वणीः गेल्या काही महिन्यांत दुचाकीपासून तर चारचाकींपर्यंत विविध अपघातांमध्ये तालुक्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. अनियंत्रित वाहतुकीचे बळी ही शहरासाठी नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे सांस्कृतिक वैभव लाभलेलं हे शहर आता ‘हादसों का शहर’’ म्हणजेच अपघातांचं शहर अशी नवी ओळख निर्माण करीत आहेत. याच मालिकेत रविवारी ब्राम्हणी फाट्याजवळ पुन्हा अपघात झाला. या अपघात चालकासह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. प्रमिला रामकृष्ण आस्वले (४०), शशीकला पंढरीनाथ कुबडे (४८) व चालक प्रशांत देवराव खाडे (२५) सर्व रा जैन ले.आऊट वणी अशी मृतांची नावे आहेत. मंगला अंबादास शेळकी (३८), अंकुश बदखल (२४), प्रतिभा राजू बोढे (३४), कमलाबाई शेळकी (५५), सूमन बापूजी बोढे (६५) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

यातील तिघांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रेफर करण्यात आले. स्कॉर्पिओ क्रमांक एम. एच. २९. ए. आर. १४३८ ने जैन ले.आऊटमधील वऱ्हाडी वणीतील महावीर भवनात आयोजित लग्नसोहळ्याकरिता जात होते. गाडी डिव्हायडरवर आदळल्याने त्यातील दोन महिला खाली कोसळल्या. याचवेळी अचानक मागून येणाऱ्या ट्रकने या दोन्हीही महिलांना चिरडले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच या ट्रकची स्कॉर्पिओला धडक बसल्याने त्यामधील चालकाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालक राजेंद्र मारोती नक्षीणे रा. नरसाळा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.