वणीमध्ये कडकडीत बंद

बंदमध्ये विविध संघटना सहभागी

0

निकेश जिलठे, वणी: भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी वणीत विविध सामाजिक संघटनेकडून बंद पाळण्यात येत आहे. मंगळवारी भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. बंदच्या हाकेला प्रतिसाद देत शहरात कार्यरत असलेल्या विविध पुरोगामी संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत.

सकाळी साडेआठच्या सुमारास भारीप बहुजन महासंघाच्या नेतृत्त्वात शहरातील विविध आंबेडकरवादी संघटनेचे कार्यकर्ते तसंच विविध पुरोगामी संघटनेचे कार्यकर्ते भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले. तिथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन विविध संघटनेचे कार्यकर्त्यांनी बंदसाठी रॅली काढली.

100 ते 150 लोकांची ही रॅली जससशी वणी शहरात फिरू लागली तससशी रॅलीत सहभागी होणा-यांची संख्या वाढू लागली, सध्या 1500 ते 2000 लोक रॅलीत सहभागी झाले आहेत. बंदच्या हाकेला वणीकरांनी उत्सुर्त प्रतिसाद दिला. वणीतील व्यापारी प्रतिष्ठान बंद आहे. सोबतच शाळा, कॉलेजेस बंद करण्यात आल्या. रॅली बस डेपो परिसरात जाताच काही काळ परिवहन मंडळाची बससेवा ही काही काळ बंद ठेवण्यात आली. त्यानंतर बससेवा पुर्ववत सुरू झाली.

सध्या रॅली वणीतील विविध भागात पोहोचून भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करीत आहे. तसंच बंदचं आवाहन करीत आहे. रॅलीमध्ये सरकारविरोधी घोषणाबाजी सुरू असून जातीयवाद पसरवणा-या संघटनेवर आणि हिंसाचाराला जबाबदार असणा-या संघटनेवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. रॅलीचा वणीतील टिळक चौक किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप होणार आहे. यावेळी बंदमध्ये सहभागी झालेल्या संघटनांच्या कार्यकर्त्यांचे भाषण देखील होणार आहे. त्यानंतर हिसाचारास कारणीभूत असणा-या मिलिंद आगबोटे आणि संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी निवेदन दिले जाणार आहे.

या बंदमध्ये विविध आंबेडकरी राजकीय आणि सामाजिक संघटनेसह, संभाजी ब्रिगेड, बीएसपी, मराठा सेवा संघ, विविध आदिवासी संघटना, एमआयएम इत्यादी संघटना सहभागी झाल्या आहेत. सध्या बंद शांततेत असून कोणत्याही प्रकारची हिंसक घटना बंद दरम्यान घडलेली नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.