यशवंतराव होळकर जयंतीनिमित्त समाजप्रबोधन मेळावा

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: महाराजा यशवंतराव होळकर यांची २४२वी जयंती लालगुडा येथील राजमाता अहल्यामाई होळकर सभागृह येथे साजरी करण्यात आली. धनगर समाज संघर्ष समिती, धनगर समाजोन्नती मंडळ, खंडोबा वाघोबा देवस्थान समिती, धनगर एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन, राजमाता अहल्याबाई होळकर महिलामंच व समाजबांधवांनी यानिमित्त गुणवंतांचा सत्कार व समाजप्रबोधन मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन पांडुरंग पंडिले यांच्या अधयक्षतेखाली आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले.

लोकमाता अहल्यामाई होळकर व राजे यशवंतराव यांचे प्रतिमापूजन झाले. यावेळी विकास चिडे यांनी अहल्यावंदन सादर केले. समाजातील दहावी, बारावी, पदवीधर व शिष्यवृत्तीधारक ५२ गुणवंतांचा सत्कार यावेळी करण्यात आला. उपस्थितांना संबोधित करताना समाजबांधवांसाठी सभागृह व स्मारकाच्या बांधकामासाठी मदतीचे आश्वासन दिले.

अविनाश जानकर व अंबर खानेकर यांनी महामानवांच्या जीवनचरित्रांवर प्रकाश टाकला. उपस्थित विद्यार्थ्यांना प्रसंगोचित मार्गदर्शनही यावेळी त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश निरे यांनी केले. आयोजनाची भूमिका विलास शेरकी यांनी मांडली. सूत्रसंचालन गजानन तुरारे व गौरव उगे यांनी केले. आभार काशिनाथ पचकटे यांनी मानले. आयोजनाची व्यवस्था भाऊराव मत्ते, विनोद खंडाळकर, रघुनाथ कांडकर, देवराव झिले, संजय कालर, विलास गवारकर, विनायक कांडरकर, रमेश बरडे यांनी सांभाळली. कार्यक्रमाच्या वेळी अविनाश जावकर, इंजि. अंबर खानेकर, रमेश जरांडे, विठ्ठलराव बुच्चे, महेश उराडे, डॉ. श्रीकांत भगत, राजेश निरे, दादाजी कालर, ज्ञानेश्वर पचकटे, मधुकर चिव्हाणे, सूर्यभान चिडे, लोपामुद्रा आस्कर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.