काँग्रेसची ‘विजयाची ब्ल्यूप्रिंट’ तयार: खा. धानोरकरांच्या नेतृत्वात रणनीती

वसंत जिनिंगमध्ये जिल्हाध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार

बहुगुणी डेस्क, वणी: आगामी वणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिनांक 4 नोव्हेंबर रोजी वसंत जिनिंग हॉल येथे काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्त्वात व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला वणी विधानसभा क्षेत्रातील शहरातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर सखोल चर्चा झाली. तसेच कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिका-यांचा सत्कार देखील करण्यात आला.

 बैठकीला वामनराव कासावार, प्रकाश वासू, संजय खाडे, ऍड देविदास काळे, नरेंद्र ठाकरे, टीकाराम कोंगरे, वंदना आवारी, शामा तोटावार, अरुणा खंडाळकर, प्रमोद वासेकर, विकेश पानघाटे, वसंतराव आसूटकर, संदीप बुरेवार, पुरुषोत्तम आवारी, अरुण नागपूरे, महेंद्र लोढा, प्रवीण काकडे, तेजराज बोढे, राजू अंकतवार, पलाश बोढे, अशोक पांडे, नंदेश्वर आसूटकर, ओम ठाकूर, जय आबड, प्रशांत गोहकार, अशोक चिकटे, रवी कोटावार, अंकुश माफूर, संदीप ढेंगळे, विवेकानंद मांडवकर, नंदकिशोर अंबोरे, पुडलिक गुंजेकार, राजू कासावार, खालिद पटेल, प्रमोद लोणारे आदी प्रमुख नेत्याची उपस्थिती होती.

 कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खा. प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की वणी शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह आणि एकजूट पाहून मला अत्यंत समाधान वाटते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. सर्व नेत्यांनी एकमताने जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत प्रभावी रणनीती आखली आहे. पक्षाची व नेत्यांची एकजूट परिवर्तनाची नवी दिशा ठरवतील. हीच एकजूट काँग्रेसला विजयाच्या दिशेने नेईल.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नवनियुक्त पदाधिका-यांचा सत्कार
बैठकीत नवनियुक्त पदाधिका-यांचा सत्कार सोहळा पार पडला. जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष वंदना आवारी, वणी तालुका अध्यक्ष विकेश पानघाटे, झरी तालुका अध्यक्ष संदीप बुरेवार, मारेगाव तालुका अध्यक्ष वसंतराव आसुटकर, वणी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अरुण नागपुरे यांचा खा. प्रतिभा धानोरकर व जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पुढील वाटचालीसाठी सर्व नवनियुक्त पदाधिका-यांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्यात.

बैठकीत वामनराव कासावार, संजय खाडे, ऍड देविदास काळे, नरेंद्र ठाकरे, अरुणा खंडाळकर इत्यादी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत आगामी निवडणुकीच्या रणनितीबाबत चर्चा केली. यासह उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी देखील आपले विचार बैठकीत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक पांडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रमोद लोणारे यांनी मांडले. बैठकीला काँग्रेसचे विविध सेलचे तसेच पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, इच्छुक उमेदवार तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.