विवेक तोटेवार, वणी: श्री स्वामी समर्थ संगीत संघाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर कराओके गीत गायन स्पर्धेचे आयोजन संताजी इंग्लिश मीडियम स्कूल येथे करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेतील ‘अ’ गटात 45, तर ‘ब’ गटात 65 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘अ’ गटात हर्षाली झाडे हिने प्रथम क्रमांक पटकावत 3,000 रुपये रोख व स्मृतिचिन्ह मिळविले. आवेश खारकर याने द्वितीय क्रमांक मिळवत 2,000 रुपये व स्मृतिचिन्ह, तर राधा कुचनकर हिने तृतीय क्रमांक मिळवत 1,000 रुपये व स्मृतिचिन्ह पटकाविले. गरिमा शेजाळ व सम्राट तामगाडगे यांना प्रत्येकी 500 रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
‘ब’ गटात शर्वरी बाविस्कर हिने प्रथम क्रमांक मिळवत 3,000 रुपये रोख व स्मृतिचिन्ह पटकाविले. प्रतीक्षा पेटकर हिने द्वितीय क्रमांक मिळवत 2,000 रुपये व स्मृतिचिन्ह, तर द्रुप निखाडे याने तृतीय क्रमांक मिळवत 1,000 रुपये व स्मृतिचिन्ह मिळविले. रिदिमा शेजाळ व तन्वी कावाडे यांना प्रत्येकी 500 रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. लय तरंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर तबला वादन सादर केले. तसेच सरगम म्युझिकचे गिटार वादक हरीश घाटे यांनी उत्कृष्ट गिटारवादन करून उपस्थितांची दाद मिळविली.
यावेळी वणीतील गायक कलाकार व मेलोडी ऑर्केस्ट्राचे स्व. सय्यद बाबू यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महेश जोशी यांनी मेल व फिमेल आवाजात गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल श्री स्वामी समर्थ संगीत संघाचे शैलेश अडपावार यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डिंपल सोनकांबळे, अर्चना गटलेवार, शफी खान, संजय शिरभाते, अशपाक सय्यद, अमोल बावणे, प्रियांका कोनप्रतीवार, रफिक शेख, रंजना भंडारवार, तृप्ती माळीकर, पुनम बावणे, अंजली गिरटकर, शितल पारधी, विद्या कटाणे, राकेश दिकुंदवार व सुनिता गालेवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपल सोनकांबळे यांनी केले. देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण लाभले. स्पर्धेला विद्यार्थी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


Comments are closed.