माळीपुरा येथे दोन दिवसीय SIR मॅपिंग शिबिर

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, आज शेवटचा दिवस

बहुगुणी डेस्क, वणी : माळी समाज बहुउद्देशीय संस्था, वणी यांच्या वतीने आयोजित एसआयआर (Special Intensive Revision 2026) मॅपिंग कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदार यादीच्या सकल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित या दोन दिवसीय शिबिराचा पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला.

हे शिबिर माळीपुरा येथील गोलाईत यांच्या दुकानासमोर 18 ते 19 एप्रिल दरम्यान सायंकाळी 4.00 ते रात्री 9.00 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. माळीपुरा परिसरातील रहिवाशांसाठी विशेषतः हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, आज (19 एप्रिल) या कॅम्पचा शेवटचा दिवस आहे.

शिबिरात बीएलओ म्हणून सौ. प्रतिभा मानकर तसेच उलटावार सर हे मार्गदर्शन करत असून, संपर्क प्रमुख म्हणून गजानन वाढई हे कार्यरत आहेत. दरम्यान, पुढील काही दिवसांत तेली फेल व दामले फेल परिसरासाठीही अशाच प्रकारचे कॅम्प आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नागरिकांनी शिबिरास येताना आधार कार्ड व मतदान ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Comments are closed.