आयटी कंपनीला वणीतील ऑफिससाठी कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह पाहिजेत
फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
बहुगुणी डेस्क, वणी: शहरात नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी एक आनंदाची बातमी असून, सुप्रसिद्ध इन्फोनेट या आयटी कंपनीतर्फे वणी येथील ऑफिससाठी Customer Care Executive पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही नोकरी पूर्णवेळ असून कार्यालयीन स्वरूपाची आहे. इच्छुकांनी आपला बायोडाटा (CV) ई-मेलद्वारे infonetwani@gmail.com या पत्त्यावर पाठवावा किंवा फक्त CV व्हॉट्सॲपद्वारे 9960281314 या क्रमांकावर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ग्राहकांचे कॉल्स हाताळणे, त्यांच्या तक्रारी व प्रश्नांचे निराकरण करणे तसेच संगणक व MS Excel मध्ये माहिती नोंदविण्याचे काम करावे लागणार आहे. निवडीनंतर उमेदवारांना आवश्यक ते प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
कोण करू शकतात अप्लाय?
इच्छुक उमेदवारांना MS Excel चे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच हिंदी व मराठी भाषेत संवादकौशल्य तसेच इंग्रजीचे बेसिक ज्ञान अपेक्षित आहे. वणी येथील कार्यालयात प्रत्यक्ष काम करण्याची तयारी असलेल्या उमेदवारांनीच अर्ज करावा. फ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवार दोघांनाही अर्ज करण्याची संधी आहे. 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा धारक तसेच ग्रॅज्युएट उमेदवारही अप्लाय करू शकतात.
निवड झालेल्या उमेदवारांना ग्राहक सेवा, माहिती व्यवस्थापन, टीम को-ऑर्डिनेशन तसेच दैनंदिन अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिली जाईल. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला बायोडाटा (CV) ई-मेलद्वारे infonetwani@gmail.com या पत्त्यावर पाठवावा किंवा फक्त CV व्हॉट्सॲपद्वारे 9960281314 या क्रमांकावर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑफिस पत्ता – MODI INFONET DIGITAL NETWORK
ब्लॉक नं. 6, 6 वा मजला, कक्ष क्र. 601 व 602, असोसी क्लस्टर,
राम शेवाळकर बिझनेस पार्क, वणी, जि. यवतमाळ, महाराष्ट्र – 445304

Comments are closed.