मुकूटबन-वणी मार्गावर गणेशपूर ग्रामवासियांचे चक्काजाम आंदोलन

0

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील मुकुटबनपासुन ४ किमी अंतरावर पोलिसांना कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता सोमवार सकाळी ११ वाजता मुकूटबन-वणी मार्गावर गणेशपूर येथे २० मिनटांचे गणेशपुर ग्रामवासियांनी चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी कलम ६८ प्रमाणे आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांना दीड तासानंतर सोडून देण्यात आले.

केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत वणी-मुकुटबन-बोरी राज्यमार्ग ३१५ रस्त्याचे सुधारणा करण्याचे कार्य शारदा कन्स्ट्रकशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे २७ नोव्हेंबर २०१५ ला सुरु करण्यात आले. या मार्गाची पूर्ण करण्याची मुदत २४ महिने होती. २४ महिने लोटूनही राज्यमार्गाचे अजून अर्धेही कार्य पूर्ण न झाल्याने हिवरदरा ते खडकी पर्यंत ३ किमी रोडवर पूर्ण गिट्टी बाहेर पडून आहे. ज्यामुळे लहान मोठे अपघातात वाढ झाली असून रोड वरील उडणाऱ्या धुळी मुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसंच जनतेचे आरोग्य व शेतीतील पिकाची होणारी नुकसान भरपाई मिळण्या करीता आशिष खुलसंगे यांच्या नेतृत्वात पोलिसांना कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता सोमवारी सकाळी ११ वाजता मुकूटबन-वणी मार्गावर गणेशपूर येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

दोन्ही बाजूला १५ ते २० चार चाकी वाहने, ५० ते ६० दुचाकी वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. त्यावेळी १५० ते २०० नागरिकांचा जमाव होता. वेळेवरच ठाणेदार गुलाबराव वाघ यांना आशिष खुलसंगे यांनी मांगण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर वाघ यांनी संबधित अधिकाऱ्यांशी बोलून २९ तारखेपर्यंत अधिका-यांशी चर्चा सभा घेऊ असे आश्वासन दिले. त्यामुळे चक्काजाम २० मिनटातच मागे घेण्यात आले.

चक्काजाम आंदोलनात युवा सेना उपजिल्हाध्यक्ष आशिष खुलसंगे, उमाकांत बदकल, रवींद्र कारेकर, रामदास बरडे, अनिल आसुटकर, प्रभाकर आसुटकर, साधू कुळसंगे, संदेश बरडे, अनंता कुळसंगे, नारायण पिदुरकार, दिलीप कारेकार, राजू आसुटकर, पंकज तातेड, सतीश बेलेकार, सुधाकर बेलेकार, रामदास बेलेकार, अनिल लिंगारेडडी, विनायक आसुटकर, गोपिका आसुटकर, भाऊराव चिने, मारोती बेलेकार, विवेक आसुटकर, अलका लोनागाडगे, देवेंद्र लोनागाडगे, सुरेश लोनागाडगे, रवींद्र लोनागाडगे, प्रकाश कोठारी, वसंत बदकल, अलका कुळसंगे, आशिष खुलसंगे, अंकुश कुळसंगे, आकाश कुळसंगे, सतीश बेलेकार, माया आवारी, व प्रभाकर लोनागाडगे ह्यापैकी २२ लोकांना कलम ६८ प्रमाणे ताब्यात घेउन दीड तासानंतर सोडुन देण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.