पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील नृसिंह व्यायाम शाळा संचालित नृसिंह स्पोर्टिंग क्लब तर्फे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना (शिंदे गट) जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संजय खाडे, संचालक कापूस उत्पादन पणन महासंघ महाराष्ट्र, भूषवणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून कुणाल चोरडिया (युवासेना शिंदे), प्रमोद इंगोले (अध्यक्ष नृसिंह व्यायाम शाळा वणी), प्रमोद निकुरे (अध्यक्ष शिवाजी व्यायाम शाळा वणी), अंकुश बोढे (जिल्हा उपाध्यक्ष भाजपा), नगरसेवक सैफुर रहमान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत 56 किलो वजन गटात सामने खेळविण्यात येणार असून विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी रु. 20001 व कप, द्वितीय क्रमांकासाठी रु. 15001 व कप, तृतीय क्रमांकासाठी रु. 10001 व कप तर चतुर्थ क्रमांकासाठी रु. 7001 व कप अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय वैयक्तिक बक्षिसांमध्ये बेस्ट रेडर, बेस्ट डिफेंडर व बेस्ट ऑलराउंडर यांना प्रत्येकी रु. 2100 व कप मिळणार आहे. श्री गजानन स्पोर्ट्स तर्फे सेकंड राऊंड बेस्ट प्लेअर कप देखील देण्यात येणार आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष कुणाल ठोंबरे, कार्याध्यक्ष गोविंदा मुजगेवार, उपाध्यक्ष अनिकेत वाढई, सचिव ब्रिजेश निंदेकर, कोषाध्यक्ष रोहित ठोंबरे व सदस्य परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे महिला संघांचा सहभाग. उद्घाटन समारंभात महिला संघाचे लक्ष्यवेधी सामने रंगणार असून त्यात नृसिंह स्पोर्टिंग क्लब वणीच्या राष्ट्रस्तरीय (सब ज्युनिअर महिला) खेळाडू गौरी पिदुरकर तसेच राज्यस्तरीय खेळाडू श्रद्धा देशमुख व जान्हवी ठाकरे यांचा समावेश असेल. महिला संघाला आम्रपाली रेस्टॉरंट तर्फे कप व पदके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुकांनी कुणाल ठोंबरे (मो. 9922842117) किंवा ब्रिजेश निंदेकर (मो. 9028497919) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



Comments are closed.