युवा नगराध्यध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या प्रयत्नांतून फुलतील 20 बगिचे
विवेक तोटेवार, वणीः प्राचार्य राम शेवाळकर यांच्या कारकीर्दीत साईनगरीजवळील बागेचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले होते. त्यांनी निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, तनुजा या चित्रपट कलावंतांना बागेच्या उद्घाटनाकरिता निमंत्रित केले होते. त्यानंतर हळूहळू ती बाग ओसाड व्हायला लागली. शहरात गणेशपूर रोडवर एक बाग आहे. काही छोट्या बागा आहेत. मात्र अलीकडच्या काळापर्यंत सगळ्याच बंद होऊन फक्त नावालाच राहिल्या आहेत.
नुकतेच साईनगरीजवळील बागेचे लोकसहभागातून पुनर्जीवन सुरू झाले. शहराचे वाढते प्रदूषण आणि लोकांची गजर लक्षात घेता युवा नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी सर्वच स्तरांतून बागांसाठी प्रयत्न चालविले. त्यांच्या प्रयत्नांना यष मिळाले. शहरातील 20 ओपन स्पेसमध्ये म्हणजेच मोकळ्या जागांवरती आता लवकरच बागा फुलतील. याबाबत नुकतच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यवतमाळ यांचं पत्र प्राप्त झालं असून. प्राधिकरणाने 5 कोटी 53 लाखांच्याा कामाला मंजुरी दिली आहे.
वणी शहर हे प्रदूषणाचे शहर आहे. लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी इथे कोणतीच सुविधा नाही. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी ही बाब लक्षात घेता यासाठी वेगाने कामाला लागले. केद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर आणि आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे मार्गदर्शनही त्यांना लाभले. बोर्डे यांनी स्वत: या सर्व जागांची पाहणी केली. त्यांच्या प्रयत्नातून शहरातील खालील मोकळ्या जागांवर आता बागा फुलणार आहेत.
वणीतील नेहरू पार्क होणार अत्याधुनिक
वणीत शहरातील गणेशपूर रोडवर असणारा वणीतील सर्वात जुना आणि मोठा बगिचा नेहरू पार्क हा आता अत्याधुनिक होणार आहे. या बागेसाठी 1 कोटी 32 लाखांचा वेगळा निधी प्राप्त झालेला आहे. या बागेत अत्याधुनिक ओपन जिम, हायमॅक्स, कारंजे, अत्याधुनिक खेळणे इत्यादी बसवण्यात येणार आहे. या बागेच्याा कामाला दिवाळीनंतर सुरूवात होणार आहे.
वणी शहरातील 50 ओपन स्पेस डेव्हलप करण्याची आमची तयारी आहे. त्यापैकी वीस ओपन स्पेसला सध्या तरी मान्यता मिळाली आहे उरलेले 30 ओपन स्पेस बाबत पडताळणी सुरू आहेत. हिरवेगार वणी करणे आणि प्रत्येक परिसरात लोकांसाठी फिरण्यीसाठी, खेळण्यासाठी उद्यान असावे याबाबत मी कायम प्रयत्नशील राहणार असे तारेंंद्र बोर्डे यांनी वणी बहुगुणीशी बोलताना सांगितले
या ठिकाणी फुलतील बागा:
1-सिंधी कालनी तेलीफैल परिसरातील ओपनस्पेस विकसित करणे रु.2438229 /
2-साईनगरी परिसरातील ओपनस्पेस विकसित करणे- रु.3728332/
3-जैन ले-आऊट मातामंदिर परिसरातील ओपनस्पेस विकसित करणे-रु.3395984/
4- जैन ले-आऊट हनुमान मंदिर परिसरातील ओपनस्पेस विकसित करणे- रु.3374340/
5-गुरुवर्य कालनी परिसरातील ओपनस्पेस विकसित करणे-रु.2280291/
6- चट्टे लेआऊट परिसरातील ओपनस्पेस विकसित करणे-रू.3288290/
7-ढुमेनगर परिसरातील ओपनस्पेस विकसित करणे-रू.2670505/
8-बजरंग नगर परिसरातील ओपनस्पेस विकसित करणे-रु.2323172/
9-प्रगतीनगर परिसरातील ओपनस्पेस विकसित करणे-रु.4903785/
10-बँक कालनी हनुमान मंदिर परिसरातील ओपनस्पेस विकसित करणे- रु.2716702/
11-एस.टी.डेपो कालनी ओपनस्पेस विकसित करणे- रु.2661302/
12-पानघाटे लेआऊट परिसरातील ओपनस्पेस विकसित करणे-रु.3750175/
13-लक्ष्मीनगर परिसरातील ओपनस्पेस विकसित करणे-रु.2354081/
14-चहानकर यांच्या घराजवळील ओपनस्पेस विकसित करणे-रु.2997856/
15- जि.प.कालनी परिसरातील ओपनस्पेस विकसित करणे-रु.4531410/
16-टिळक नगर परिसरातील ओपनस्पेस विकसित करणे-रु.2782758/
17- लालबहादूर शास्त्री परिसरातील ओपनस्पेस विकसित करणे-रु.5372827/
18-आय.टी.आय.कालनी परिसरातील ओपनस्पेस विकसित करणे-रु.3412971/
19- विठ्ठलवाडी परिसरातील ओपनस्पेस विकसित करणे-रु.3851496/
20- सपाट यांचे घरासमोरील ओपनस्पेस विकसित करणे-रु.3304224/