कायर, घोन्सा गणाकडे सर्वांचे लक्ष, पंचायत समितीचे आरक्षण जाहीर
5 जागा महिलांसाठी राखीव, जाणून घ्या कुठे मिळाली कुणाला संधी?
बहुगुणी डेस्क, वणी: वणी पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत आज महसूल भवन येथे पार पडली. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी नितीन कुमार हिंगोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोडतीत 10 गणांचे व 5 गटाचे आरक्षण जाहीर झाले. पं. स. मध्ये 5 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमाती (ST) साठी कायर आणि घोन्सा हे दोन गण, अनुसूचित जाती (SC) साठी राजूर हे एक गण, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) साठी तरोडा आणि शिंदोला या दोन जागा राखीव ठेवण्यात आल्या. सभापतीपद एसटी महिलांसाठी राखीव असल्याने सर्वांचे लक्ष कायर आणि घोन्सा गणाकडे लागले आहे.
विशेष म्हणजे, कायर गण महिला राखीव असले तरी घोन्सा हे एसटी राखीव गण असल्याने येथून मोठ्या संख्येने महिला उमेदवार निवडणुकीत उतरतील, अशी शक्यता आहे.
अपडेट – जिल्हा परिषदेचे आरक्षण देखील जाहीर झाले आहे. यात वागदरा घोन्सा नामाप्र जनरल, शिरपूर कायर नामाप्र (स्त्री), शिंदोला-तरोडा सर्वसाधारण, राजूर-चिखलगाव सर्वसाधारण, नांदेपेरा-वेल्हाळा सर्वसाधारण
आरक्षणाची सोडत लोकसंख्येच्या गुणोत्तरावर आधारित काढण्यात आली. वणी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या गावांची एकूण लोकसंख्या 1,51,409 असून, त्यानुसार आरक्षण निश्चित झाले. यापूर्वी महिला राखीव असलेल्या गणांना यावेळी पुन्हा महिला आरक्षण लागू करण्यात आले नाही.
आरक्षणाचा तपशील:
खुला प्रवर्ग (5 जागा):
चिखलगाव – सर्वसाधारण महिला
नांदेपेरा – सर्वसाधारण
वेल्हाळा (वसाहत) – सर्वसाधारण
शिरपूर – सर्वसाधारण महिला
वागदरा – सर्वसाधारण महिला
अनुसूचित जमाती (ST) – 2 जागा:
कायर – महिला
घोन्सा
अनुसूचित जाती (SC) – 1 जागा:
राजूर
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – 2 जागा:
तरोडा
शिंदोला – महिला

आरक्षणाची सोडत पाच वर्षीय बालक “मंथन” याच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार निखिल धूळधर, गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर, विवेक पांडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.



Comments are closed.