जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना विषाणूच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा तडाखा बसूनही आता यवतमाळ जिल्हा या आघातातून सावरत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी तयार होऊ पाहत असताना संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात वणी शहरातील नागरिकांनी लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याचं स्पष्ट होत आहे.
आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या यादीनुसार शहरी भागात लसीकरण मोहिमेत वणी ग्रामीण रुग्णालय जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तर वणी उप विभागातील कायर प्राथमिक आरोग्य केंद्र हा ग्रामीण भागात लसीकरण मोहीम राबविण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

यवतमाळ जिल्ह्यात दि 9 ऑक्टोबर पर्यंत झालेल्या लसीकरणच्या आकडेवारीनुसार वणी ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीची सर्वात जास्त 34 हजार 908 लसीकरण करण्यात आले आहे. तर ग्रामीण भागात कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत 16 हजार 87 नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. वणी ग्रामीण रुग्णालय व कायर प्राथ. आरोग्य केन्द्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नर्सेज, आंगनवाड़ी सेविकाचे अथक परिश्रम घेतले.
लसीकरणाच्या प्रबोधनासाठी स्माईल फाऊंडेशनचा पुढाकार
परिसरात अधिकाधिक लोकांनी लस घ्यावी यासाठी शहरातील स्माईल फाउंडेशनने पुढाकार घेतला होता. स्माईल फाउंडेशनतर्फे परिसरात प्रबोधनाची मोहीम राबवण्यात आली होती. संस्थेतर्फे शेकडो वृद्ध तसेच निराधार लोकांना स्वखर्चाने लसीकरण केंद्रावर आणण्यात आले. तसेच रांगेत असलेल्या हजारो वृद्धांचे रजिस्ट्रेशन संस्थेतर्फे करण्यात आले.
वणी शहरातील व ग्रामीण भागात ज्या लोकांनी अद्याप कोरोना लस घेतली नाही, त्यांनी आपली नोंदणी करून कोव्हीशील्ड किंवा कॉवेक्सिन जी लस उपलब्ध आहे ती घ्यावी. असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. कुणाला रजिस्ट्रेशनसाठी समस्या असल्यास स्माईल फाउंडेशनला संपर्क साधावा असे आवाहन स्माईल फाउंडेशनचे सागर जाधव यांनी केली आहे.
हे देखील वाचा:
