‘खद खद’ फेम कराळे मास्तर आज वणीत

स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन

जब्बार चीनी, वणी: आपल्या शिकविण्याच्या अनोख्या शैलीने अल्पावधीतच सुपरहिट झालेले ‘खद खद’ फेम शिक्षक तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रा. नितेश कराळे हे आज वणीत येणार आहे. सोबतच उमेश कोर्राम, अध्यक्ष-स्टुडंट राईट असोसिएशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली हे देखील आज वणीत हजेरी लावणार आहे. रविवार दि.10 ऑक्टोंबर ला शेतकरी मंदिर, वणी येथे दुपारी 12 वाजता ओबीसी जनगनणा तसेच स्पर्धा परिक्षेबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत ते मार्गदर्शन करणार आहेत. ओबीसी (व्हिजे, एनटी, एसबीसी) जातनिहाय जनगणना कृती समिती वणी-मारेगाव-झरी द्वारे या कार्यक्रमाचे आयोज करण्यात आले आहे.

अस्सल वऱ्हाडी भाषेतून विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा, करिअर गाईडन्स व अन्य विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणारे तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणावर थेट टीका करणारे, शेतकरी, विद्यार्थी व सामान्य नागरिकांचा प्रश्न अगदी रोखठोक सरकार समोर मांडणारे व नेहमी महाराष्ट्रातील आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी धावून जाणारे अशी प्रा. नितेश कराळे, संचालक-फिनिक्स अकॅडमी, वर्धा यांची ओळख आहे.

स्पर्धा परीक्षेचे तसेच चालू घडामोडीवर ते ऑनलाईन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. अतिशय सोप्या आणि सहज भाषेत ते समजावून सांगतात. त्यांची बोलण्याची वऱ्हाडी भाषेतील शैलीने ते अल्पावधीतच प्रसिद्ध झाले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

50 एकरची सोलर झटका मशिन अवघ्या 8490 रुपयांमध्ये

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवरात्री स्पेशल ‘बिग धमाका’ ऑफर लॉन्च

Comments are closed.