7 विविध ठिकाणी दारू तस्करांवर धाड

ब्लॅक डायमंड सिटी बनत आहे अवैध दारू तस्करीचं आगार

0

रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भागात गस्तावर असलेल्या ठाणेदार व सहकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात धाडी टाकून अवैध दारुसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनात वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुकुंद कुळकर्णी हे डीबी पथकासह गस्तावर असतांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी तालुक्यातील बोर्डा गावाकडून रासा कडे येणाऱ्या एम एच एच 969 या कारला थांबवून झडती घेतली असता त्यात ४२ हजार दोनशे ४० रुपयांची अवैध दारू व  ६५ हजार रुपये किमतीच्या कारसह साई रमेश कोसारी (१९) उमेश प्रकाश शिंदे (१९) दोघेही रा. रासा यांना एक लाख सात हजार दोनशे चाळीस रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.

शहरातून रोहित गोवर्धन हांडे 23 हा जलशुद्धीकरण परिसरातून दुचाकी क्र एम एच 29 बीए 7348 ने  सात हजार सहाशे रुपये किमतीची विदेशी दारू विनापरवाना नेत असताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडून ५७ हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून अटक केली आहे.

सोबतच दुर्गदेश उर्फ सोनू भास्कर तिरणकार याला 2 हजार 700 रुपयांची दारू व २० हजार रुपये किमतीची एम एच 29 एक्स  5837 दुचाकी असा एकूण २२ हजार 700 रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.

विराणी टॉकीज भागात नायलॉनच्या पिशवीत 7 हजार 600 रुपये किमतीची विनापरवाना दारू घेऊन जाणाऱ्या कुंदन हनुमान पेंदोर यालाही ताब्यात घेतले.

भगतसिंग चौकात संदली पांडुरंग वाढई (30) हा बॅग मध्ये देशी व विदेशी कंपनीची 8 हजार 190 रुपयांची दारू अवैधरित्या घेऊन जात असतानाच पोलिसांनी त्याला पकडले.

वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठिकाणी धाड सत्र राबवून उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मुकुंद कुळकर्णी, पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश निर्मल, सुदर्शन वानोळे, मनोज अभ्यंकर, प्रभाकर कांबळे, सदाशिव मेघावत, शेख नफिस, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, उल्हास कुरकुटे, विकास धडसे, रत्नपाल मोहाडे, हरींदर भारती, दिलीप जाधव, सुहास राजूरकर व चालक प्रशांत आडे यांनी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.