वणीतील दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश

टिकल्या व त्याच्या साथीदाराच्या आवळल्या मुसक्या

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरात दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीच्या आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. अवघ्या एका आठवड्यात पोलिसांनी घरफोडीचा छडा लावला आहे. सुमित राजू मानकर (22, रा. रंगनाथनगर, वणी) आणि राहुल उर्फ टिकल्या निलकंठ ठेंगणे (32, रा. रंगनाथनगर, वणी) असे आरोपींचे नावं आहेत. त्यांच्यावर एका घरफोडीच्या प्रयत्नाचा देखील आरोप आहे. यासह पोलिसांनी बॅटरी चोरीचा देखील पर्दाफाश केला आहे. डीबी (गुन्हे शोध) पथकाने ही कारवाई केली आहे. या तिन्ही प्रकरणात 2 महिलांसह 5 जणांना अटक करण्यात आली.
रामपूरा वॉर्ड येथील रहिवासी देवराव नथ्थुजी जांभूळकर (65) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी किचनच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून प्रवेश केला होता. घरातील कपाट फोडून त्यामधील शेतीच्या मकत्यातून आलेली ₹15 हजारांची रोकड चोरून नेण्यात आली होती. या प्रकरणी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने या घरफोडीचा तपास सुरु केला होता.
डीबी पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी आरोपी सुमित राजू मानकर (22, रा. रंगनाथनगर, वणी) आणि राहुल उर्फ टिकल्या निलकंठ ठेंगणे (32, रा. रंगनाथनगर, वणी) यांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. तसेच या सह त्यांच्यावर एका घरफोडीचा प्रयत्न करण्याचा गुन्हा देखील नुकताच दाखल करण्यात आला होता. त्यांच्याकडून चोरलेली रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

बॅटरी चोरीचा पर्दाफाश
काही दिवसांआधी एक बॅटरी चोरीचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी विजय देवानंद मेश्राम (32, रा. नवीन लालगुडा, वणी) याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली. चौकशीअंती त्याला बॅटरी चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन बॅटरी जप्त करण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबीन बन्सल (पांढरकवडा विभाग, प्रभारी वणी) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या नेतृत्वात डीबी पथक प्रमुख पोउपनि सैय्यद साजीद, पोलीस हवालदार गजानन सावसाकडे, मारोती पाटील, निलकमल भोसले, पोलीस अंमलदार गणेश मेश्राम, नंदकुमार पुष्पलवार, मोनेश्वर खंडरे, रितेश भोयर, चालक शुभम किन्नाके, महिला पोलीस अंमलदार चैताली चेन्डे व सहकाऱ्यांनी पार पाडली.

Job Alert : बजाज फिनसर्व, वणी शाखेत भरती सुरू

Comments are closed.