वणीत 2022 मध्ये होणार टेनिस बॉल क्रिकेटची धमाल

'वणी प्रीमियर लीग' साठी आयोजक आणि स्टार खेळाडूची नोंदणी 19 नोव्हेंबर ला

जितेंद्र कोठारी, वणी: संपूर्ण जगात क्रिकेट हा सर्वात जास्त आवडता खेळ म्हणून ओळखले जाते. भारतातही क्रिकेटचे करोडों चाहते आहे. टेस्ट व वन-डे मॅचनंतर 20-20 सामन्यामुळे आबालवृद्ध क्रिकेटचे शौकीन झाले आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या स्थापनेनंतर ग्रामीण भागातील अनेक होतकरु खेळाडूंची प्रतिभा जगासमोर आली आहे.

आयपीएल संघाच्या धर्तीवर शहरातही वणी प्रीमियर लीग (WPL) संघाचे गठन करण्यात येत आहे. इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब वणीतर्फे डब्ल्यू पी एल संघात खेळण्यासाठी क्रिकेट संघ मालक व आयकॉन खेळाडूंची नोंदणी व लिलाव प्रक्रियेसाठी आमंत्रण देण्यात आले आहे. WPL संघात फक्त वणी, मारेगाव व झरीजामणी तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंची निवड केली जाईल. WPL मध्ये 8 संघ सहभागी होणार असून प्रत्येक संघाचे वेगवेगळे संघ मालक राहणार आहे. संघ मालक होण्याचे इच्छूक व्यक्तींची तसेच आयकॉन खेळाडूंची नोंदणी 19 नोव्हेंबरला तर संघ लिलाव 20 नोव्हेंबरला येथील वसंत जिनिंग सभागृहात पार पडणार आहे.

वणी प्रीमियर लीग नोंदणी व खेळाडूंची निवड झाल्यानंतर पाण्याची टाकीजवळ शासकीय मैदानावर 20-20 टेनिस बॉल सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे. विदर्भ क्रिकेट संघाशी संलग्न इलेव्हन स्टार क्रिकेट क्लबतर्फे वणी प्रीमियर लीग (WPL) चे आयोजन केले जाणार आहे.

संघ मालक होण्याचे इच्छूक तसेच आयकॉन खेळाडूंनी 11starwpl.in या संकेतस्थळावर लॉगिन करून नोंदणी करावी. किंवा डब्ल्यू पी एल संघाचे आयोजक यांच्याशी संपर्क करून नोंदणी करावी. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

नोंदणीसाठी संपर्क करा:-
राजाभाऊ पाथ्रडकर – 8208815354
विनोद निमकर – 9822576861
राकेश बुग्गेवार – 7972884347
शैलेश ढोके- 9822561450
मंगेश करंडे – 9730803002
संतोष चिल्कावार- 8669178401

हे देखील वाचा:

फाशी घेतलेल्या व विष पिलेल्या तरुणाला मिळाले जीवदान

प्रिन्स लॉनजवळ विचित्र अपघात, भरधाव अल्टो कारची दुचाकी, कार व अॅटोला धडक

Comments are closed.