पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या 50 वर्षांपासून वणीत प्रभू श्रीराम नवमी उत्सव व शोभायात्रेचे आयोजन रामनवमी उत्सव समिती द्वारा केले जाते. ह्या वर्षी दिनांक २ एप्रिल २०२० ला श्रीराम नवमी उत्सव समिती द्वारे राम नवमी उत्सव व शोभायात्रेचे आयोजन उत्सव समिती द्वारे करण्याचे ठरले होते. मात्र कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता हा उत्सवाला व शोभायात्रा रद्द करण्याचा निर्णय़ घेण्यात आला.
श्रीराम नवमी उत्सव शोभायात्रा समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत कोरोनाचा संसर्ग वाढू नये व सर्व भाविकांचे हित लक्षात घेता हा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णय समितीत कुंतलेश्वर तुरविले, प्रशांत भालेराव, किरण बुजोणे, प्रशांत माधमशेट्टीवार, राजाभाऊ पाथ्रडकर, राजाभाऊ बिलोरीया, संतोष डंभारे, श्रीकांत पोटदुखे, राकेश बुग्गेवार, राजेंद्र सिडाम, गणेश धानोरकर, मनोज सरमुकदम, निलेश डवरे, कौशिक खेरा, आशिष डंभारे, नितेश मदिकुंटावार, पंकज कासावार, प्रणव पिंपरे, पवण खंडाळकर, रवि रेभे, प्रसन्ना संदलवार, अवि आवारी, रोहण शिरभाते, मयुर मेहत, विशाल दुधबळे, अँड.आतिष कटारीया, शिवम सिंग, कुनाल मुत्यलवार, आकश खंडाळकर, आकाश बुध्देवार, विशाल ठोंबरे, कैलास पिपराडे, कम्लेश त्रिवेदी, पंकज त्रिवेदी, पियुष सत्तपलकर इत्यादी उपस्थित होते.
जैताई चैत्र नवरात्रोत्सव रद्द
जैताई देवस्थान येथे दि. 25 मार्च ते 2 एप्रिल 2020 पर्यंत चैत्र नवरात्रानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात कीर्तन महोत्सव , विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांचे व्याख्यान आणि संस्कार भारतीच्या गीत रामायणाच्या कार्यक्रमासह अन्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र हे कार्यक्रम रद्द करण्यात आले तसेच यादरम्यान रोज ठेवण्यात येणा-या महाप्रसादाचे वितरणही रद्द करण्याचा निर्णय़ घेण्यात आल्याची माहिती जैताई दैवस्थान संस्थेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.