वणीत संस्कृत बालसंस्कार शिबिराची सांगता

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: संस्कृत भारतीच्या वणी शाखेने प्रगतीनगर येथील किड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये संस्कृत बालसंस्कार शिबिर घेतले.

दिनांक १० एप्रिल ते२०एप्रिल या काळात घेण्यात आलेल्या या शिबिराची सांगता प्रा. म. गो. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी संस्कृत भारतीचे नगरमंत्री महेश पुंड यांनी शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या बालसंस्कार शिबिरात समापनाच्या वेळी गार्गी राहुल खाडे, स्पृहा कोरडे, सान्वी मुंजेकर,  अनुष्का रायकर, गार्वी पाटील तथा अनुज यादव या विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेत विविध कलागुणांचे प्रदर्शन केले.

पालकवर्गाच्या वतीने मंदा राजेश धोपटे यांनी आपल्या मनोगतात शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले. शिबिराचे संचालन रेणुका अणे, सुरभी उंबरकर तथा कोमल बोबडे यांनी केले. समापन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा देशपांडे हिने केले.

शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना झालेले लाभ आणि त्यामुळे पालकांनी प्रतिवर्षी असे शिबिर घेण्याचा केलेला आग्रह हे या शिबिराचे सगळ्यात मोठे यशच होय.

Leave A Reply

Your email address will not be published.