सावित्री जिजाऊ दशरात्रौत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर
धनोजे कुणबी समाज, मराठा सेवा संघ व संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरमचा उपक्रम
बहुगुणी डेस्क, वणी : वणी येथील धनोजे कुणबी समाज संस्था, मराठा सेवा संघ आणि छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्री जिजाऊ दशरात्रौत्सवाच्या निमित्ताने धनोजे कुणबी समाज सांस्कृतिक भवनात रविवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जिजाऊ वंदनेने शिबिराची सुरुवात झाली. या उपक्रमात तब्बल 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे महिला रक्तदात्यांचा सहभाग लक्षणीय ठरला असून तो प्रेरणादायी ठरला.
शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथील टीमने सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र प्रदान केले. तसेच आयोजकांकडून पुष्पगुच्छ, केळी व ज्युस देऊन स्वागत करण्यात आले. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत शिबिर पार पडले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनोजे कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष मंगेश रासेकर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अंबादास वागदरकर, छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरमचे सचिव मंगेश खामनकर यांच्यासह अरुण डवरे, विनोद बोबडे, नगरसेवक अजय धोबे, मारोती जिवतोडे, अमोल टोंगे, अभय पानघाटे, सचिन ढोके, संजय जेऊरकर, दत्ता पुलेनवार, कवडू नागपूरे, रवि चांदणे, जीवन चौधरी, सुभाष गेडाम, बबन यादव, नितीन आवारी, सोनाली जेणेकर, पल्लवी वागदरकर, आशा कोवे, पल्लवी सुर, योगिता गोहोकर, निशा खामनकर आदींनी अथक परिश्रम घेतले.





Comments are closed.