उधारीचे पैसे मागितल्यावरून वाद; बापलेकांची मारहाण

सिंधी कॉलोनीतील घटना, दोघांविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणीउधार दिलेले पैसे परत मागण्यावरून झालेल्या वादातून बापलेकाने एकाला मारहाण केली. रविवारी दिनांक 29 मार्च रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास सिंधी कॉलोनी येथे ही घटना घडली. मारहाण केल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी आरोपी बापलेका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Birthday

फिर्यादी अंकीत मोहनराव कुचेवार (वय 40 रा. मनोरमा अपार्टमेंट, वणी) हे बजाज फायनान्समध्ये खाजगी नोकरी करतात. त्यांनी काही दिवसांपूर्वी राहुल अहुजा यांना पैसे उसने दिले होते. 29 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 4 वाजताच्या सुमारास अंकीत कामानिमित्त सिंधी कॉलनीत कामानिमित्त गेले होते. दरम्यान तिथे राहुल अहुजा (वय अंदाजे 35) व त्याचे वडील गोपी अहुजा (वय अंदाजे 55) दिसले. अंकीत याने तेव्हा त्यांच्याजवळ पैशाचा विषय काढला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पैसे परत मागितल्यावर दोघांनी “तू आम्हाला कधी पैसे दिले होते?” असे म्हणत वाद घालत थापडबुक्याने मारहाण केली. या मारहाणीत अकील यांचा मोटारसायकलवरील तोल जाऊन ते खाली पडले व त्यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली. मारहाणीनंतर आरोपींनी “पुन्हा पैसे मागितलेस तर जिवाने मारून टाकतो” अशी धमकी देत शिवीगाळ केली आणि तेथून निघून गेले.

अंकीत कुचेवार यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी राहुल अहुजा व गोपी अहुजा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 115(2), 351(2)(3) व 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments are closed.