वणी येथे तणावमुक्त जीवनशैलीचा संदेश देणारे मार्गदर्शन शिबिर

गुरुवारी वसंत जिनिंग हॉलमध्ये मोफत शिबिर, नोंदणी आवश्यक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: धकाधकीच्या जीवनात वाढत चाललेल्या तणावावर मात करण्यासाठी “स्ट्रेस फ्री लाईफ – पुट स्ट्रेस टू रेस्ट” हा मार्गदर्शन कार्यक्रम वणी येथे आयोजित करण्यात आला आहे. “हॉपी थॉट” तेजज्ञान फाउंडेशन यांच्या वतीने गुरुवार, दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. वसंत जिनिंग हॉल, वणी येथे होणाऱ्या या शिबिरात ताणमुक्त, संतुलित जीवन कसे जगावे, दैनंदिन तणावावर नियंत्रण कसे ठेवावे तसेच मनःशांतीसाठी आवश्यक कौशल्ये याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

स्व-निरीक्षणाची कला (Self Reporting) शिकविणे, शरीर व मनातील तणाव दूर करण्याचे उपाय यावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रवेश निशुल्क असलेल्या या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजक सतीश पिंपळे, अनिल अग्रवाल, दिलीप अग्रवाल, रामजी महाकुलकर, पुंडलिक जोगी, संजय लिहीतकर, विशाल खांदणकर, नितेश बावणे, निरंजन खाडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9850780260 व 8999921283 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

Comments are closed.