वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना वणी पोलिसांचा चाप

तब्बल 76 वाहन चालकांना दंड, शहरभर कारवाई

विवेक तोटेवार, वणी: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध वणी पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. दिनांक 2 ते 7 फेब्रुवारी दरम्यान वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लाल पुलिया परिसर, दीपक चौपाटी परिसर, बसस्थानक परिसर व टिळक चौक या भागात विशेष मोहिम राबविण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या कारवाईत रस्त्यावर धोकादायक स्थितीत वाहने उभी करणे, भरधाव वाहन चालविणे तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 285 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली. एकूण 76 वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रस्ते अपघातांची संख्या वाढत असल्याने पोलिसांनी ही कारवाई हाती घेतली असून, सर्व वाहनचालकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी व नियमानुसार उभी करावीत तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. 

Comments are closed.